Walkeshwar Banganga : बाणगंगा परिसरातील आरतीला होत आहे विरोध; व्यवस्थापन घेणार पोलीस अधिकाऱ्यांची भेट

73
Walkeshwar Banganga : बाणगंगा परिसरातील आरतीला होत आहे विरोध; व्यवस्थापन घेणार पोलीस अधिकाऱ्यांची भेट
Walkeshwar Banganga : बाणगंगा परिसरातील आरतीला होत आहे विरोध; व्यवस्थापन घेणार पोलीस अधिकाऱ्यांची भेट

मलबार हिल (Malabar Hill) येथील बाणगंगा वाळकेश्वर हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरात विविध देवी देवतांची मंदिरे आहेत. त्यातीलच एक जुने जबरेश्वर महादेव मंदिर हे खूपच प्रसिद्ध आणि प्राचीन काळापासून म्हणजे साधारण २५० वर्षांपासून आहे. अनेक भाविक मोठ्या संख्येने महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरात येत असतात. प्रत्येक सोमवारी या मंदिरात आरती केली जाते. या आरतीला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. (Walkeshwar Banganga)

(हेही वाचा – उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी रणनीती; कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ निर्देश)

आठवड्यातून एकदाच होते आरती

आठवड्यातून एकदाच होणाऱ्या या आरतीवर मंदिर परिसरातील काही परप्रांतीय मंडळींनी आक्षेप घेतला आहे. आरतीसाठी ४ वाद्यांचा वापर केला जातो. टाळ, डमरू, नगारा आणि घंटा या वाद्यांच्या व्यतिरीक्त कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वाद्याचा वापर केला जात नाही. तरीही जबरेश्वर मंदिरातील (Jabareshwar Temple) सोमवारच्या आरतीचा त्रास होत आहे, अशी करण्यात येते. यासाठी काहींनी आरतीविषयी मलबार हिल पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार केली जाते. त्यामुळे पोलीस मंदिरात येऊन आरती करतेवेळी नगारा वाजवू नका, आरती शॉर्टकटमध्ये करा, अशा सूचना देत असल्याचे शिवभक्त कल्पेश कोकाटे यांनी सांगितले. (Mumbai Temples)

आरतीत वारंवार व्यत्यय आणण्याचा प्रयत्न होत असल्याने मंदिर व्यवस्थापनाकडून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार आहे. (Walkeshwar Banganga)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.