- प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी पक्षाने पक्की तयारी करण्याचे आवाहन केले आहे. “जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील, यासाठी प्रयत्न करा आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच काम करा,” असे स्पष्ट निर्देश अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले.
गुरुवारी नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातील सुमारे ५० गावांतील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुमारे अडीचशे पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. या सोहळ्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा – Bhandara Blast : स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट ; १३ मृत, आकडा वाढण्याची शक्यता)
स्थानिक निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिबीरामध्ये जनमानसात चांगली प्रतिमा तयार करण्याचा विचार मांडला गेला होता. त्यानुसार नवीन कार्यकर्त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नांदेड जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. यासाठी लागणारे सर्व सहकार्य पक्षाकडून आणि सरकारकडून केले जाईल.”
राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेल्या सभासद नोंदणी मोहिमेबाबतही त्यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. “तळागाळातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळवण्यासाठी जनतेच्या समस्या सोडवण्यावर भर द्या,” असे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – Pollution in Mumbai : नवी मुंबईतील विकासकांकडून प्रदूषण नियमांचे उल्लंघन; दीड कोटींची दंडवसूली)
सुनिल तटकरे : अजितपर्वाला पुढे नेताना भविष्याचा वेध घ्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करताना सांगितले, “तुमच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढणार असून आता आपण अजितपर्वाला पुढे नेताना भविष्याचा वेध घ्यायचा आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये तळागाळापर्यंत पोहोचून कार्यकर्त्यांना मजबूत करायचे आहे.”
नांदेड जिल्ह्यातील क्रियाशील सभासद नोंदणीसाठीही त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. “तुमच्या पाठीशी पक्षाची ताकद उभी आहे. तुम्ही नोंदणीसाठी प्रयत्न करा, आम्ही तुमच्या प्रयत्नांना साथ देऊ,” असे आश्वासन त्यांनी दिले.
(हेही वाचा – Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदेसह ११ जणांविरोधात FIR दाखल ; प्रकरण काय ?)
पक्षप्रवेश सोहळा : मोठ्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या पक्षप्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सुनिल तटकरे, आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार इद्रीस नायकवडी, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी यांसह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा – Donald Trump यांच्या नागरिकत्वाच्या निर्णयाला न्यायालयाकडून स्थगिती)
भविष्यातील दिशादर्शन
या प्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाच्या आगामी योजनांचा आढावा घेत कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या तयारीसाठी प्रोत्साहन दिले. “पक्षाचे कार्यकर्ते सतत हालचालीत ठेवले पाहिजेत. त्यानुसार कार्यक्रम आणि धोरण तयार केले जातील. आम्ही केवळ राजकारण करत नाही, तर सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
नांदेड जिल्ह्यातील या मोठ्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील ताकदीत मोठी वाढ झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाने तयारीला लागण्याचे संकेत देत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community