राज्य परिवहन विभागाने (RTO) ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license) प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि गुणवत्ता आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात लवकरच ३८ ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उभारण्यात येणार आहेत. या ट्रॅकच्या माध्यमातून पक्क्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षांना आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार मिळणार आहे, असे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार (Transport Commissioner Vivek Bhimanwar) यांनी सांगितले. सध्या पुण्याच्या भोसरीमध्ये पहिला ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक कार्यान्वित आहे. देशातील इतर राज्यांमध्ये असे ट्रॅक यशस्वी ठरत आहेत. या ट्रॅकवर घेण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये वाहनचालकांच्या कौशल्याची अचूक मोजणी होते. (Driving Test Track)
(हेही वाचा – उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी रणनीती; कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ निर्देश)
ऑटोमॅटिक ट्रॅकच्या माध्यमातून होणाऱ्या चाचण्यांमध्ये फेल होण्याचे प्रमाण ३०-३५ टक्के आहे, तर मॅन्युअल चाचण्यांमध्ये हे प्रमाण केवळ १ टक्क्यांपर्यंत मर्यादित असते. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक विश्वासार्ह असून, वाहनचालकांच्या क्षमतेचे खरे मूल्यांकन यामधून करता येईल. तसेच आधुनिक चाचणी पद्धतीमुळे चांगले ड्रायव्हर घडवले जातील. यामुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होऊन सुरक्षित वाहतुकीला चालना मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशी घेतली जाते टेस्ट
सध्या लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये पास झाल्यावर त्या उमेदवाराला सहा महिन्यांच्या आत आरटीओ कार्यालयात जाऊन प्रात्यक्षिक परीक्षा (Driving Test) द्यावी लागते. ही परीक्षा मॅन्युअल पद्धतीने घेतली जाते. परीक्षेमध्ये गाडी चालविताना उमेदवाराचे मूल्यांकन पर्यवेक्षकाकडून करण्यात येते. त्यानंतर उमेदवाराला पक्के लायसन्स देण्यात येते.
(हेही वाचा – राज्यात चाललंय तरी काय? गेल्या तीन महिन्यांत १०८५ कोटींचा Cyber fraud)
ऑटोमॅटिक ट्रॅकवर अशी घेतली जाईल चाचणी
ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकवर (Automatic driving test track) चाचणी घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. प्रत्येक ट्रॅकवर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेरे बसविले जातील. तसेच हे कॅमेरे वाहनचालकाच्या चाचणी प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवतील. कॅमेऱ्याच्या माध्यमातून ड्रायव्हिंग चाचणीदरम्यान वळणे, साइड पार्किंग, रिव्हर्स स्पीड आदी सर्व पैलूंची नोंद केली जाईल. दरम्यान, सिस्टीम स्वतः वाहनचालकाच्या चुका ओळखून त्यांचे मूल्यांकन करेल. मानवी हस्तक्षेप कमी असल्याने प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह बनेल, असे आयुक्त म्हणाले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community