अतिरिक्त कर टाळण्यासाठी अमेरिकेत गुंतवणूक करा, Donald Trump यांची सर्व देशांना खुली ऑफर

58
अतिरिक्त कर टाळण्यासाठी अमेरिकेत गुंतवणूक करा, Donald Trump यांची सर्व देशांना खुली ऑफर
अतिरिक्त कर टाळण्यासाठी अमेरिकेत गुंतवणूक करा, Donald Trump यांची सर्व देशांना खुली ऑफर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सत्ता हाती आल्यानंतर अनेक आदेशांवर सह्या केल्या आहेत. यामध्ये ट्रम्प यांनी कर रचनेत वाढ केली आहे. याच संदर्भात दि. २३ जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्वित्झर्लंडमधील (Switzerland) दावोस येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ला संबोधित केले. यावेळी त्यांनी जगातील बड्या देशांना जर तुम्हाला कर टाळायचा असेल तर तुम्ही अमेरिकेत (America)
गुंतवणूक करा, अशी थेट धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे.

( हेही वाचा : Chief Minister Medical Assistance Cell होणार पेपरलेस; स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली सुरू होणार

व्हाईट हाऊसमधून दावोस (Davos) येथील जगभरातील बड्या देशांच्या कंपन्यांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना ट्रम्प यांनी आपल्या भाषणादरम्यान अमेरिकन उद्योगाच्या पुनर्बांधणीवर भर दिला, जो त्यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाशी सुसंगत आहे. ज्या कंपन्या त्यांचे उत्पादन अमेरिकेत आणतील त्यांना मोठ्या प्रमाणात कर कपात करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ते म्हणाले की ‘तुमचे उत्पादन अमेरिकेत करा आणि आम्ही तुमच्यावर जगातील कोणत्याही देशापेक्षा कमी कर लादू” अशी खुली ऑफर देखील त्यांनी यावेळी दिली.ट्रम्प यांनी सांगितले की जर तुम्ही अमेरिकेत उत्पादन केले नाही तर तुम्हाला टॅरिफ शुल्क भरावे लागेल. या शुल्कांमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला शेकडो अब्ज डॉलर्सचा फायदा होईल, ज्यामुळे अमेरिकेची तिजोरी भरण्यास आणि कर्ज कमी करण्यास मदत होईल, असा दावा त्यांनी केला आहे.

ट्रम्प यांच्या या धोरणामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांवर, विशेषतः ज्या कंपन्या परदेशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत, त्यांचे मोठे परिणाम होऊ शकतात. शुल्क लादल्याने अनेक कंपन्यांना विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोटिव्ह आणि ग्राहकांशी संबंधित कंपन्यांना त्यांच्या उत्पादन धोरणांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडले जाऊ शकते.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.