POP Ganesh Murti Banned: माघी गणेशोत्सवापासून न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार का? मूर्तीकार आणि गणेशोत्सव मंडळांचा सवाल

29

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (POP) गणेश मूर्तींवर बंदी घालण्यात आलेली आहे, त्यामुळे मूर्तीकार, गणेशोत्सव मंडळ आणि  सर्वसामान्य भाविकांची अजूनही द्विधा मनःस्थिती आहे. दरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर (पीओपी) बंदी घालण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिले असून, माघी गणेशोत्सवापासून न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.  (POP Ganesh Murti Banned)

एखाद्या मंडळाने आदेशाचा भंग केल्यास थेट कारवाई करण्याचा पवित्रा महापालिका (BMC) घेणार नाही. मात्र, न्यायालयाच्या आदेशाचा भंग झाल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरू शकतो, याचे भान बाळगूनच मंडळांनी कार्यवाही करावी, अशी पालिकेची भूमिका असल्याचे समजते. ‘पीओपी’ मूर्तीवरील बंदीच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस प्रदूषण नियंत्रण मंडळ (Pollution Control Board), महापालिका, मूर्तिकार, कुंभार समाजाचे प्रतिनिधी, सार्वजनिक गणेशोत्सव समिती यांच्या बैठका होत आहेत. न्यायालयाचा निर्णय पाळावाच लागेल, अशी भूमिका पालिकेने या बैठकांमध्ये घेतली आहे. 

(हेही वाचा – Driving License मिळवणे झाले सोपे! राज्यात ३८ ऑटोमॅटिक Driving Test Track तयार होणार)

… तर तो अवमान ठरू शकतो

पीओपीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यास पालिका कारवाई करणार का, अशी विचारणा पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली असता, हा विषय संवेदनशील आणि धार्मिक आहे. अशा प्रकरणात थेट कारवाईची  भाषा  करता येत नाही. न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावीच लागते, न केल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरू शकतो, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे एकूणच वस्तुस्थिती लक्षात घेऊन सर्वांनीच तारतम्याने निर्णय घेतला पाहजे, असे ते म्हणाले. एकूणच या मुद्द्यावर पालिका स्वतःहून काही कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाही, असे दिसते.

(हेही वाचा – Shiv Sena UBT कडून शिवसेनेत भांडणे लावण्याचा प्रयत्न!)

पर्यावरणमंत्र्यांकडे मूर्तिकारांनी मांडली भूमिका

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे (Environment Minister Pankaja Munde) यांच्या अध्यक्षतेखाली दोनच दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत  काही मूर्तिकारांनी या विषयावर आपली भूमिका मांडली होती. त्यावेळी त्यावर न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करावेच लागेल, असे मुंडे यांनी स्पष्ट केले होते तरीही ‘पीओपी’च्या मूर्तींबाबत गोंधळ सुरूच आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.