Mahakumbh 2025 मध्ये श्रीराम मंदिराची प्रतिकृती

48
Mahakumbh 2025 मध्ये श्रीराम मंदिराची प्रतिकृती
Mahakumbh 2025 मध्ये श्रीराम मंदिराची प्रतिकृती

प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ मेळ्यात अयोध्येतील श्रीराम मंदिराची (Shri Ram Temple) प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या भव्य श्रीराम मंदिरा रामलल्लांची मूर्तीही बसवण्यात आली आहे. मूर्ती हुबेहूब अयोध्येतील (Ayodhya)  मूर्तीसारखीच आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत (Gajendra Singh Shekhawat) यांच्या शुभहस्ते नुकतेच या मंदिराचे औपचारिक उद्धाटन झाले.  (Mahakumbh 2025)

( हेही वाचा : Republic Day : कर्तव्यपथावर फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख करणार ध्वजावर पुष्पवृष्टी

महाकुंभ परिसरातील सेक्टर-१ ही राम मंदिराची भव्य प्रतिकृती तयार केली आहे. दरम्यान रात्रीच्या वेळी महाकुंभातील या मंदिरावरील रोषणाई सर्वांना आकर्षित करते. मंदिराची भव्यता आणि सौंदर्य पाहून अनेकजण भारावून जात आहेत. या राम मंदिराला भेट देण्यासाठी भाविकांना ५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. मंदिर परिसरात यासाठी नियमित काऊंटर व्यवस्था करण्यात आलेली आहे. फायबर पासून तयार केलेले हे मंदिर मुंबईच्या बिजबाश कंपनीतर्फे उभारण्यात आले आहे. कंपनीचे प्रमुख विपुल नागदा यांनी हा अभिेमानाचा क्षण असल्याचे सांगितले. (Mahakumbh 2025)

हेही पाहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.