Gangster DK Rao : एन्काऊंटरमध्ये ठार झालेला गुंड हॉस्पिटलमध्ये जिवंत झाला होता; २७ वर्षांपूर्वीच्या घटनेची आता का होतेय चर्चा?

136
Gangster DK Rao : एन्काऊंटरमध्ये ठार झालेला गुंड हॉस्पिटलमध्ये जिवंत झाला होता; २७ वर्षांपूर्वीच्या घटनेची आता का होतेय चर्चा?
Gangster DK Rao : एन्काऊंटरमध्ये ठार झालेला गुंड हॉस्पिटलमध्ये जिवंत झाला होता; २७ वर्षांपूर्वीच्या घटनेची आता का होतेय चर्चा?
  • संतोष वाघ

वर्ष होत १९९१, मुंबईसह संपूर्ण देशात अंडरवर्ल्डच्या दहशतीचं वातावरण होतं. अशातच अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खास हस्तक असलेला गँगस्टर रवींद्र मल्लेश बोरा उर्फ डीके राव यांच्याविषयी एक रंजक कथा घडली होती. १९९१-९२ मध्ये डीके राव (Gangster DK Rao) आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. मात्र तो पळून गेल्याने वाचला. त्यानंतर ही त्यांच्यासोबत पोलिसांची अनेकदा चकमक झाली. पण काही ना काही कारणामुळे डीके राव बचावला. दरम्यान १९९८ मध्ये झालेल्या चकमकीत त्याला सात गोळ्या लागल्या. पोलिस अधिकाऱ्यांना वाटले की, तो मेला आहे. त्यामुळे त्याला मृत समजून त्याचा देह स्ट्रेचरवर ठेवून रुगणालयात आणले गेले. पण अचानक तो शुद्धीवर आला आणि त्याने डॉक्टरला आवाज देऊन मी जिवंत आहे मला वाचवा म्हणून गयावया केली. पण २७ वर्षापूर्वीच्या घटनेची आठवण पुन्हा होण्याचे कारण म्हणजे याचं डीके राव याला दि. २२ जानेवारीला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने त्याच्या इतर ६ साथीदारांसह अटक केली आहे.

डीके रावच्या अटकेमुळे त्याचा पूर्वीचा इतिहास ताजा झाला आहे. डीके राव हा तीन वेळा पोलीस चकमकीत बचावला होता. दोन वेळा पळून गेल्यामुळे बचावला होता तर एकदा त्याला सात गोळ्या लागूनही तो बचावला होता. डीके राव हा पोलीस चकमकीत तर कधी प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडाकडून कसा बचावला गेला त्याचे किस्से चकमकफेम पोलिस अधिकाऱ्यांकडून आजही ऐकायला मिळतात.

गँगस्टर रवींद्र मल्लेश बोरा उर्फ डीके राव (Gangster DK Rao) याच्यावर जवळपास सन १९९३ पासून २०१७ याकाळात ४१ पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दरोडा, खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न आणि अपहरण यासारखे गंभीर गुन्हे डीके राव वर दाखल असून अनेक गुन्ह्यात त्याच्यावर दाखल आहेत. मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये ८० ते ९० च्या दशकात डीके राव या नावाचा चांगलाच दबदबा होता. डीके रावला दाऊदचा कट्टर शत्रू असल्याचे बोलले जाते. डीके राव हा ९० च्या दशकात मुंबईतील एक कु-प्रसिद्ध गुंड होता आणि त्याने अनेक वर्षे छोटा राजनसोबत काम केले होते. त्याचे नाव अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये समोर आले होते. तो गेल्या बऱ्याच काळापासून तुरुंगात देखील होता. डीके राव ला रवींद्र मल्लेश बोरा म्हणूनही ओळखले जाते.

(हेही वाचा – अतिरिक्त कर टाळण्यासाठी अमेरिकेत गुंतवणूक करा, Donald Trump यांची सर्व देशांना खुली ऑफर)

मुंबईतील माटुंगा येथे जन्मलेल्या डीके रावचे (Gangster DK Rao) बालपण झोपडपट्टीत गेले. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही खूपच हालाखीची होती. डीके राव थोडा मोठा झाल्यावर चोर, दरोडेखोरांच्या टोळीसोबत राहू लागला. या टोळीसोबत राहून त्याने चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी झाला. यानंतर तो छोटा राजनच्या टोळीत सामील झाला. या काळात त्याने अनेक बँका लुटल्या आणि मोठ्या उद्योजकांच्या हत्येतही त्याचे नाव आले. हळूहळू त्याला छोटा राजनचा उजवा हात म्हटले जाऊ लागले. ८० चे दशक जसजसे सरत होते तसतसे मुंबईत गँगस्टर डीके रावची भीतीही वाढत होती. छोटा राजनसोबत काम करताना डीके राव अपहरण, खंडणी आणि खंडणीसारख्या कारवायांमध्ये सहभागी होता. तो छोटा राजनच्या सांगण्यावरून बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी उकळू लागला होता. खंडणी न दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकीही द्यायचा. डीके राव गुन्हेगारी खटल्यांमुळे अनेक वेळा तुरुंगात गेले, परंतु प्रत्येक वेळी सुटका झाल्यानंतर ते पुन्हा त्याने गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या.

१९९१-९२ मध्ये डीके राव (Gangster DK Rao) आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. मात्र तो पळून गेल्यामुळे बचावला. त्यानंतर, १९९३ मध्ये झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटानंतर छोटा राजन दाऊदपासून वेगळा झाला. डीके राव हा देखील छोटा राजनसोबत गेला. असे म्हटले जाते की, या काळात छोटा शकीलने त्याला दाऊद टोळीच्या सामील होण्यासाठी अनेक वेळा ऑफर दिली होती. मात्र त्याने ही ऑफर नाकारली आणि तो छोटा राजनसोबतच राहिला. दाऊदपासून वेगळे झाल्यानंतर, दाऊद टोळीतील गुंडांनी डीके रावला (Gangster DK Rao) लक्ष्य केले होते. दाऊद टोळी डीके रावची खबर पोलिसांना देऊ लागले आणि तो मुंबई पोलिसांच्या रडार आला. डीके रावला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत अनेकवेळा डीके राव आणि पोलिसांच्या चकमकी झाल्या परंतु प्रत्येक वेळी तो बचावला. असे सांगण्यात येते की, डीके राव आणि पोलिसांमध्ये तीन चकमकी झाल्या, ज्यामध्ये ते दोन वेळा तो थोडक्यात बचावला होता.

(हेही वाचा – फुटणाऱ्यांना Uddhav Thackeray यांच्याकडून अप्रत्यक्ष धमकी!)

माजी चकमकफेम अधिकारी सांगतात की, एका चकमकीत त्याला सात गोळ्या लागल्या होत्या. आम्ही त्याला मेला म्हणून समजून त्याचा देह स्ट्रेचरवर ठेवून रुगणालयात आणले आणि अचानक तो शुद्धीवर आला आणि त्याने डॉक्टरला आवाज देऊन मी जिवंत आहे मला वाचवा म्हणून गयावया केली. डॉक्टरांनी तात्काळ त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये आणून त्याच्या शरीरातील सर्व गोळ्या काढून त्याचे प्राण वाचवले असे माजी पोलीस अधिकारी आजही त्या चकमकीची आठवण करून देतात. डीके राव (Gangster DK Rao) याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न इत्यादी विविध गंभीर गुन्ह्यांखाली सुमारे ४१ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तथापि, तो अनेक प्रकरणांमध्ये निर्दोष सुटला आहे. त्याचा अनेक वर्षांचा सहकारी छोटा राजन याला पकडल्यानंतर आणि भारतात आणल्यानंतर त्याने स्वतःची टोळी तयार केली. २०१३ मध्ये, प्रसिद्ध अजय गोसालिया गोळीबार प्रकरणात डीके राव यांचे नावही पुढे आले. यानंतर, त्याला एका खून प्रकरणात अटक करण्यात आली आणि तो तुरुंगात गेला, परंतु जुलै २०१६ मध्ये त्याची सुटका झाली.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर डीके रावने (Gangster DK Rao) पुन्हा त्याच्या टोळीसोबत पैसे उकळण्यास सुरुवात केली. दरम्यान, ऑक्टोबर २०१७ मध्ये त्याने अँटॉप हिलमधील एका बिल्डरकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यात बिल्डरने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. हा बिल्डर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत काम करत होता आणि डीके राव यांनी त्याला काम थांबवण्यास सांगितले होते आणि ५० लाख रुपयांची खंडणीही मागितली होती. डीके राव मागील काही वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पमध्ये आला. काही बांधकाम व्यवसायिकांना हाताशी धरून त्याने काम सुरू केले होते. सोबत तो वादग्रस्त प्रॉपर्टीमध्ये हात टाकून त्याने कमिशन एजंट सारखे काम सुरू केले होते. सोबत जोडधंदा म्हणून त्याने वादग्रस्त प्रॉपर्टीमध्ये दोन पार्टीमध्ये मध्यस्थी करून तर कधी धमकावत मोठ्या रकमा वसूल करीत होता. डीके रावला नुकतीच मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अडीच कोटींच्या खंडणी प्रकरणी अटक केलेली असून त्याच्यावरील सर्व जुन्या गुन्ह्याचे रेकॉर्ड पोलिसांनी बाहेर काढले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.