स्वतंत्रपणे लढण्याची Shiv Sena UBT ला भीती?

78
स्वतंत्रपणे लढण्याची Shiv Sena UBT ला भीती?
  • खास प्रतिनिधी 

शिवसेना उबाठाला (Shiv Sena UBT) स्व:बळावर महापालिका निवडणूक लढवण्यास भीती वाटते का? असा सवाल उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर केला जात आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी गुरुवारी २३ जानेवारी २०२५ या दिवशी अंधेरी येथे शिवसेना उबाठाच्यावतीने (Shiv Sena UBT) कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणूक स्व:बळावर लढणार की काँग्रेस-राष्ट्रवादी (शप) आघाडी करून, हे स्पष्ट केले नाहीच. उलट शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण केला.

(हेही वाचा – अतिरिक्त कर टाळण्यासाठी अमेरिकेत गुंतवणूक करा, Donald Trump यांची सर्व देशांना खुली ऑफर)

संभ्रमात आणखी भर

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईतील पदाधिकाऱ्यांची विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका मातोश्रीवर घेतल्या आणि त्यांचे म्हणणे ऐकले. त्यानंतर बहुतांश पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणूक ही आघाडीत न लढता स्वतंत्रपणे लढवावी, असे मत व्यक्त केले. गुरुवारी याबाबत शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे काही ठोस निर्णय घेऊन जाहीर करतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती, मात्र तसे काही न होता प्रमुखांनी कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रमात आणखी भर टाकली.

(हेही वाचा – ‘दक्ष’ प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासन गतीने कार्यवाही करणार; कौशल्य विकास मंत्री Mangal Prabhat Lodha यांची ग्वाही)

खात्री पटली की…

“मला तुमची जिद्द बघूद्या, तयारी बघूद्या, ज्या भ्रमात आपण राहिलो त्या भ्रमातून बाहेर या. ज्या क्षणी आपली खात्री पटेल की आपली तयारी झाली आहे मी कार्यकऱ्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही,” असे सांगून कार्यकर्त्यांनाच बुचकळ्यात टाकले. त्यामुळे शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढण्यास घाबरते आहे का? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला तर नवल ते काय?

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.