Fact Check: भारतीय नागरिकाला जपानमध्ये अल्पवयीन मुलीच्या विनयभंगासाठी अटक? काय आहे ‘त्या’ छायाचित्रामागचे पाकिस्तान कनेक्शन

85
Fact Check: भारतीय नागरिकाला जपानमध्ये अल्पवयीन मुलीच्या विनयभंगासाठी अटक? काय आहे 'त्या' छायाचित्रामागचे पाकिस्तान कनेक्शन
Fact Check: भारतीय नागरिकाला जपानमध्ये अल्पवयीन मुलीच्या विनयभंगासाठी अटक? काय आहे 'त्या' छायाचित्रामागचे पाकिस्तान कनेक्शन

Claim Review : हरियाणातील रहिवासी प्रमोद राठोड (Pramod Rathod) यांनी जपानमध्ये एका मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करत त्यांना अटक केल्याचे सांगण्यात आले आहे.

Claimed By : सोशल मीडिया युजर्स
Fact Check : दिशाभूल
Created By : पीटीआय
Translate By : हिंदुस्थान पोस्ट मराठी

FACT – जपानमध्ये विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला व्यक्ती प्रमोद राठोड नसून अफजल मोहम्मद आहे. तसेच अफजल हा भारतीय नसून पाकिस्तानी नागरिक आहे.

Fact Check: नुकतेच सोशल मीडियावर एका व्यक्तीचे छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्याचे दिसत आहे. काही सोशल मीडिया युजर्सने दावा केला की, तो हरियाणाचा रहिवाशी प्रमोद राठोड आहे. त्यात असेही सांगण्यात आले की, राठोड याला मुलीचा विनयभंग केल्यामुळे पोलीसांनी अटक केली आहे. मात्र पीटीआयच्या फॅक्ट चेकमध्ये माहिती मिळाली की, छायाचित्रात असणारी व्यक्ती अफजल मोहम्मद (Afzal Mohammad) असून तो पाकिस्तानी नागरिक आहे. त्याला सप्टेंबर २०२४ ला जपानमधील एका लोकल ट्रेनमध्ये शाळेच्या मुलीवर विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र छायाचित्र चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Fact Check)

व्हायरल पोस्टमध्ये काय आहे?

दि. २० जानेवारी रोजी एका एक्स अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आले की, ज्यामध्ये कथित प्रमोद राठोड (Pramod Rathod) नावाच्या एका भारतीय पुरूषाचे छायाचित्र आहे. ज्याला जपानमध्ये (Japan) हायस्कूलच्या मुलीचा विनयभंग केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. यात पोस्टची लिंक देण्यात आली असून स्क्रीनशॉट शेअर करण्यात आली आहे. (Fact Check)

सत्यता पडताळणी

अलीकडच्या काळात जपानमध्ये कोणत्याही भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे का? हे शोधण्यासाठी डेस्कने गुगलवर एक कस्टमाइज कीवर्ड सर्च केला. त्यानंतर अशी कोणतीही घटना घडल्याची माहिती मिळाली नाही. सत्यता पडताळणीत डेस्कने पुढे गुगल लेन्सद्वारे आरोपीचे छायाचित्र सर्च केल्यावर दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी हिंदू पोस्ट नावाच्या एका वेब पोर्टलने प्रकाशित केलेली बातमी समोर आली. (Fact Check)

बातमी अलीकडेच प्रकाशित झाल्यामुळे सोशल मीडियावर वारंवार शेअर केली जात होती. त्यातच ही व्यक्ती पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती मिळाली. ज्याला ट्रेनमध्ये हायस्कूलच्या मुलीचा विनयभंग केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. ज्यामध्ये आरोपी हा पाकिस्तानी नागरिक (३१) असून अफजल मोहम्मद (Afzal Mohammad) असे त्याचे नाव असल्याचे कळले. त्यामुळे या माहितीवरून असा निष्कर्ष काढण्यात आला की, व्हायरल छायाचित्रात दिसणारी व्यक्ती हरियाणातील नसून पाकिस्तानी नागरिक आहे.

(सदर फॅक्ट चेक पीटीआय या वेबसाईटने प्रसिद्ध केलं आहे. ‘शक्ती कलेक्टिव्ह’चा भाग म्हणून ‘हिंदुस्थान पोस्ट’ने त्याचा अनुवाद केला आहे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.