10 वर्ष कृषीमंत्री राहून काय केलं? त्याचा हिशोब द्या; मालेगावातून Amit Shah यांचा शरद पवारांना थेट सवाल

77

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शप गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदाह हल्लाबोल केला आहे. ते मालेगावमध्ये (Amit Shah Malegaon) बोलत होते. पवार साहेब आपण 10 वर्ष कृषी मंत्री राहिलात, त्यावेळी सहकार क्षेत्र आपल्याकडे होतं, आपण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी, सहकारासाठी काय केलं? असा सवाल यावेळी अमित शाह यांनी उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचा (Cooperative Sugar Factory) 46 हजार कोटी रुपये टॅक्स कमी करण्याचं काम आमच्या सरकारने केलं असे विधान अमित शाह यांनी केले.

नेमकं काय म्हणाले अमित शाह? 

महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचा 46 हजार कोटी रुपये टॅक्स कमी करण्याचं काम आमच्या सरकारने केलं. पवार साहेब आपण 10 वर्ष कृषी मंत्री राहिलात, त्यावेळी सहकार क्षेत्र आपल्याकडे होतं, आपण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी (Sugar factory), सहकरासाठी काय केलं? मार्केटिंग नेता (Marketing Netaa Sharad Pawar) बनून फिरणं सोपं आहे, जमिनीवर राहून काम करणे गरजेचं असतं असा हल्लाबोल यावेळी अमित शाह यांनी शरद पवारांवर केला आहे.

लाल बहादुर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जय विज्ञानचा नारा दिला. सहकाराच्या माध्यमातून चालवलं गेलं तर शेतीमध्ये निश्चित फायदा होतो. शेतकरी परंपरागत शेती करतो, अत्याधुनिक भूमी परीक्षण प्रयोगशाळा इथे तयार करण्यात आली आहे. पाण्याची पीएच मात्रा किती आहे याचा अभ्यास देखील याठिकाणी केला जातो आहे. 1500 गिर गाई आहेत, त्यातून सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट तयार होतील. यामुळे ऑरगॅनिक शेतीची (Organic Farming) सुरुवात देखील होईल. 

(हेही वाचा – POP Ganesh Murti Banned: माघी गणेशोत्सवापासून न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार का? मूर्तीकार आणि गणेशोत्सव मंडळांचा सवाल)

ऑर्गेनिक कॉर्पोरेट स्थापन करून शेती माल विक्री करून जो पैसा येणार तो शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. ऑर्गेनिक प्रमाणपत्र असणारे उत्पादन तयार करा असं आवाहन यावेळी अमित शाहांनी शेतकऱ्यांनी केलं. जवान आणि किसान हे दोघेच ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता भारत माताची सेवा करतात असे विधान अमित शाह यांनी केली. अमित शाह यांच्या कार्यक्रमाला उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उपस्थित होते.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.