National Tourism Day : का साजरा केला जातो राष्ट्रीय पर्यटन दिन?

59
National Tourism Day : का साजरा केला जातो राष्ट्रीय पर्यटन दिन?

पर्यटन म्हणजे कोणत्याही देशासाठी अभिमानाची बाब असते. यातून अर्थ निर्मिती देखील होत राहते. त्यामुळे कोणताही देश पर्यटन क्षेत्रात अधिक लक्ष देत असतो. भारतातील पर्यटनाचे महत्त्व वाढवण्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रीय पर्यटन दिनाची (National Tourism Day) सुरुवात करण्यात आली. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये पर्यटन क्षेत्राचे योगदान ९.२ टक्के आणि रोजगारात ८.१ टक्के आहे.

पर्यटनाला आर्थिक विकास आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे एक प्रमुख साधन बनवण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नातून राष्ट्रीय पर्यटन दिनाची सुरुवात झाली. पहिला राष्ट्रीय पर्यटन दिन (National Tourism Day) १९४८ मध्ये साजरा करण्यात आला होता. राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या घोषणेनंतर, भारतातील पर्यटनाला मोठी चालना मिळाली. भारतातील पर्यटन स्थळांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले. दरवर्षी पर्यटन मंत्रालय केंद्र सरकारच्या संस्थांच्या सहकार्याने देशभरात पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करत असते.

(हेही वाचा – Suicide : पोलीस हवालदाराच्या मुलाने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या)

भारत सांस्कृतिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक विविधतेसाठी जगभर ओळखला जातो. भारत देश भौगोलिकदृष्ट्या प्रचंड मोठा असल्यामुळे इथे पर्यटन व्यवसायाला चांगला वाव आहे! राष्ट्रीय पर्यटन दिनाचे (National Tourism Day) उद्दिष्ट पर्यटन क्षेत्राच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करणे आणि पर्यटनाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक योगदानाच्या दृष्टीने मूल्यांबाबत जागतिक स्तरावर जागरूकता वाढवणे असे आहे.

भारताची संस्कृती खूपच प्राचीन आहे. भारत हा वारसा, संस्कृती, अध्यात्म, विज्ञान आणि अद्वितीय विविधतेचा खजिना आहे. म्हणूनच हा दिन (National Tourism Day) साजरा केला जातो. भारताने पर्यटनावर जर आणखी लक्ष केंद्रित केले तर देशाच्या आर्थिक विकासामध्ये मोठी भर पडेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.