- ऋजुता लुकतुके
आयसीसीने सालाबादप्रमाणे यंदाही आपला वार्षिक सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर केला आहे आणि या संघात तिघा भारतीय खेळाडूंना स्थान मिळालं आहे. सलामीवीर म्हणून यशस्वी जयस्वालने जागा पटकावली आहे. तर अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि तेज गोलंदाज जसप्रीत बुमराहही या संघात आहेत. या संघाचा कर्णधार आहे पॅट कमिन्स आणि विशेष म्हणजे या संघातील तो एकमेव ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. (ICC Test Team of the Year)
(हेही वाचा – Bangladesh मध्ये हिंदू विद्यार्थ्याची हत्या; १२ कट्टरपंथींनी विद्यार्थ्याची हत्या केल्याची स्थानिकांची माहिती)
इंग्लंडचे ४ आणि न्यूझीलंडचे २ खेळाडूही यात आहेत. विशेष म्हणजे किवी माजी कर्णधार केन विल्यमसनने या संघात स्थान मिळवलं आहे. भारताचा जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियातील बोर्डर-गावस्कर मालिकेत मालिकावीर ठरला होता. इथं ५ कसोटींत त्याने सर्वाधिक ३२ बळी मिळवले. तर भारताने ही मालिका १-३ अशी गमावली. पण, बुमराहने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सतावणं कायम ठेवलं. याच मालिकेत भारताकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ३९१ धावाही केल्या. रवींद्र जडेजा या मालिकेत १३५ धावा आणि ४ बळी घेऊ शकला. पण, सध्या आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तो सर्वोत्तम आहे आणि वर्षभरातील त्याची कामगिरी भरीव आहे. (ICC Test Team of the Year)
(हेही वाचा – Australian Open 2025 : पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनर वि. झ्वेरेव)
Congratulations to the incredibly talented players named in the ICC Men’s Test Team of the Year 2024 👏 pic.twitter.com/0ROskFZUIr
— ICC (@ICC) January 24, 2025
विशेष म्हणजे पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचा एकही खेळाडू या यादीत नाही. आयसीसीचा २०२४ चा सर्वोत्तम कसोटी संघ पाहूया, (ICC Test Team of the Year)
पॅट कमिन्स (कर्णधार-ऑस्ट्रेलिया), बेन डकेट (इंग्लंड), यशस्वी जयस्वाल (भारत), केन विल्यमसन (न्यूझीलंड), जो रुट (इंग्लंड), हॅरी ब्रूक (इंग्लंड), कामिंदू मेंडिस (श्रीलंका), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक-इंग्लंड), रवींद्र जडेजा (भारत), मॅट हेन्री (न्यूझीलंड) व जसप्रीत बुमराह (भारत)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community