Axis Bank Share Price : ॲक्सिस बँक शेअरचं लक्ष्य संशोधन संस्थांनी का केलं कमी?

Axis Bank Share Price : गेल्याच आठवड्यात ॲक्सिस बँकेनं आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. 

81
Axis Bank Share Price : ॲक्सिस बँक शेअरचं लक्ष्य संशोधन संस्थांनी का केलं कमी?
  • ऋजुता लुकतुके

बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या तिमाही निकालांनी यंदा शेअर बाजाराला निराश केलं आहे. गेल्या आठवड्यात ॲक्सिक बँकेचे जाहीर झालेले निकाल हे त्यापेक्षा वेगळे नव्हते. बँकेकडे असलेल्या मुदतठेवींचं प्रमाण पुरेसं वाढलेलं नाही. बँकेचा किरकोळ ग्राहकांबरोबरचा व्यवसाय तसंच लघु व मध्यम उद्योजकांबरोबरचा व्यवसाय यात ४६ टक्क्यांची घट दिसून आली आहे. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत कर्जाचं प्रमाणही कमी झालं आहे. (Axis Bank Share Price)

आणि या सगळ्याचा परिणाम अर्थातच, ॲक्सिस बँकेच्या शेअरवरही झाला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर एका आठवड्यात कंपनीचा शेअर जवळ जवळ साडेतीन टक्क्यांनी खाली आला आहे. तर शुक्रवारी शेअर २ अंशांनी खाली येऊन ९४८ रुपयांवर बंद झाला आहे. (Axis Bank Share Price)

(हेही वाचा – Jio Coin : जिओ कॉईन हा काय प्रकार आहे? हे कॉईन कसं मिळवता येतं?)

New Project 2025 01 25T173820.372

गेल्या एका महिन्यात ॲक्सिस बँकेचा शेअर १२ टक्क्यांनी किंवा १३० अंशांनी कमी झाला आहे. काही प्रमुख संशोधन संस्थांनी ॲक्सिस बँकेच्या शेअरचं लक्ष्य कमी केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे १२ महिन्यांचं लक्ष्य बदलताना, आणखी मोठी पडझड होणार नसल्याचा दिलासाही दिला आहे. नवुमा या संस्थेनं १२ महिन्यांचं लक्ष्य १,२२० इतकं निर्धारित केलं आहे. यापूर्वी हे लक्ष्य १,३३० इतकं होतं. (Axis Bank Share Price)

एमके फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने ॲक्सिस बँकेचं लक्ष्य १,४०० रुपयांवरून १,३०० रुपयांवर आणलं आहे. तर मोतीलाल ओस्वास फायनान्शिअल सर्व्हिसेसने कंपनीच्या शेअरचं रेटिंग न्यूट्रल ठेवलं असून लक्ष्यही १,१७५ वर आणलं आहे. (Axis Bank Share Price)

(टीप-शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणुकदारांनी स्वत:च्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरमधील गुंतवणुकीसाठी कुठलाही सल्ला देत नाही.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.