Intercontinental Hotel Mumbai : मुंबईच्या इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेल्सचे मालक नक्की कोण आहेत?

Intercontinental Hotel Mumbai : इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेल्सचा भारतात विस्तार करण्यात येणार आहे. 

49
Intercontinental Hotel Mumbai : मुंबईच्या इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेल्सचे मालक नक्की कोण आहेत?
  • ऋजुता लुकतुके

मुंबईच्या मरिन लाईन्सवर अरबी समुद्राच्या साक्षीने मुंबईची ओळख जपणाऱ्या काही इमारती उभ्या आहेत आणि त्यातीलच एक आहे इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेलची एक उंच इमारत. अगदी खालच्या रस्त्यावरूनही इमारतीच्या गच्चीवरील डोम किंवा मनोरा दिसतो आणि तिथून अरबी समुद्रात ढळणारा सूर्य पाहणं हा एक सर्वोत्तम अनुभव आहे. केवळ त्या अनुभवासाठी लोक गच्चीवरील रेस्तराँमध्ये जातात. तशीही या हॉटेलची ओळख ही जशी इथली पंचतारांकित जीवनशैली आहे तसंच इथं असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेस्तराँमुळे हे हॉटेल प्रसिद्ध झालं आहे. (Intercontinental Hotel Mumbai)

(हेही वाचा – Axis Bank Share Price : ॲक्सिस बँक शेअरचं लक्ष्य संशोधन संस्थांनी का केलं कमी?)

इंटरकॉन्टीनेन्टल हॉटेल्स हा वास्तविक ब्रिटिश-अमेरिकन समुह आहे. सहा खंडात आपली पंचतारांकीत हॉटेल असावीत या महत्त्वाकांक्षेनंच हा समुह काम करतो. पण, त्याची सुरुवात अगदी १७७७ मध्ये झाली आहे. विल्यम बास यांनी बास ब्रुअरी या नावाने एक रेस्तराँ सुरू केलं केंट परगण्यात बर्टन इथं. तिथून त्यांनी तारांकीत रेस्तराँची एक मालिकाच इंग्लंडमध्ये सुरू केली. पण, त्यात राहण्याची सोय सुरू झाली ती १९६९ मध्ये. बास समुहाने टाईड पब्लिक हाऊसेस ही कंपनी विकत घेतली आणि क्रेस्ट हॉटेल्स नावाने नवीन चेन सुरू केली. १९९० मध्ये त्यांनी हॉलीडे इन हा ब्रँड त्यांच्या सर्व मालमत्तेसह विकत घेतला आणि पाठोपाठ १९९० मध्ये त्यांनी हॉटेल इंटरकॉन्टीनेन्टल ही चेनही विकत घेतली. तेव्हापासून जगभरातील कॉन्टिनेन्टल हॉटेल ही बास हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स यांच्या मालकीची आहेत. इंटरकॉन्टीनेन्टल ग्रुप हा पूर्वी अमेरिकन उद्योजक युआन ट्रिप यांच्या मालकीचा होता. (Intercontinental Hotel Mumbai)

(हेही वाचा – Wankhede Stadium @50 : वानखेडे मैदानावर चेंडूंनी बनवलेलं डिझाईन पोहोचलं गिनीज बुकमध्ये)

२००२ मध्ये समुहाचं विभाजन झालं आणि फक्त हॉटेल व्यवसाय सांभाळण्यासाठी इंटरकॉन्टीनेन्टल हॉटेल ग्रुप स्थापन करण्यात आला. या कंपनीकडे जगभरातील हॉटेलचे १८ ब्रँड अंतर्भूत आहेत आणि यातील पंचतारांकित सेवा देणाऱ्या इंटरकॉन्टीनेन्टल हॉटेल ही जगभरात २२४ ठिकाणी आहेत. मुंबईतील इंटरकॉन्टीनेन्टल हॉटेल २००३ साली बांधलेलं आहे. अलीकडे २०१८ मध्ये या वास्तूचं नुतनीकरण झालं आहे. ९ मजल्यांच्या या हॉटेलमध्ये विविध प्रकारच्या ५९ रुम्स आहेत. या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे इथली १४ रेस्तराँ आहेत. शिवाय हेल्थ क्लब, स्पा, पूल अशा सुविधाही इथे आहेत. हॉटेलचं एका दिवसाचं भाडं म्हणाल तर ते २२९ अमेरिकन डॉलर एका व्यक्तीसाठी पासून सुरू होतं. (Intercontinental Hotel Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.