सनातन धर्मावर (Sanatan Dharma) जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा नागा साधूंनी हातात शस्त्रे घेऊन आक्रमकांना चोख प्रत्युत्तर दिले. त्याच नागा साधूंना फक्त १५ मिनट दिली तर इस्लामिक कट्टरपंथींना चांगलाच धडा ते शिकवतील, असे विधान तेलंगणाचे भाजपा आमदार टी. राजा सिंह ठाकूर (T.Raja Singh) यांनी केले. सकल हिंदू (Hindu) समाजाच्यावतीने कोल्हापूरातील शिरोली (Shiroli) येथे आयोजित केलेल्या विराट हिंदू महासभेत ते बोलत होते. (T.Raja Singh)
( हेही वाचा : Gukesh India No One : गुकेश अर्जुन एरिगसीला मागे टाकून बनला भारताचा नंबर वन बुद्धिबळपटू)
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांनी आपल्या एका जाहीर सभेत ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवले तर शंभर कोटी हिंदूंना (Hindu) संपवू’ अशा प्रकारचे वादग्रस्त विधान केले होते. अकबरुद्दीन ओवेसीच्या (Akbaruddin Owaisi) या विधानानंतर अनेकानी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. त्याच ‘१५ मिनिटांच्या’ वक्तव्याला टी राजा यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिल्याचे दिसते आहे. (T.Raja Singh)
टी. राजा (T.Raja Singh) पुढे म्हणाले की, हिंदूंशी (Hindu) पंगा घ्यायची हिंमत करू नका. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सुरु असलेल्या महाकुंभात लाखो नाही तर कोट्यावधी हिंदू त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी येत आहेत. त्यामध्ये येणाऱ्या साधूंमध्ये नागा साधूही आहेत. नागा साधू कधीच सार्वजनिक ठिकाणी येत नाहीत. ते कुंभमेळ्याच्या वेळी दिसतात. त्यांचा इतिहास पाहिला तर, सनातन धर्मावर आक्रमण करणाऱ्यांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलेले दिसते, असे म्हणत टी. राजा यांनी ओवौसी बंधुंना चांगलीच चपराक लगावली आहे. (T.Raja Singh)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community