Bangladesh कडील सीमा पाकिस्तानप्रमाणे होणार सीलबंद 

72

बांगलादेशातील (Bangladesh) बदलती राजकीय परिस्थिती आणि पाकिस्तानशी बांगलादेशाचे निर्माण झालेले घनिष्ट संबंध तसेच भारतासोबतच शत्रुत्व यामुळे भारत आणि बांगलादेशमधील सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भारताने बांगलादेशातील भारताची सीमा सीलबंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रजासत्ताक दिनापूर्वी भारत- बांगलादेश (Bangladesh) सीमेवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. भारत आणि बांगलादेशमध्ये ४,०९६ किमी एवढी लांब सीमा आहे. या सीमेवर घुसखोरी केली जाते. पाकिस्तानसारखीच ही सीमा देखील कुंपण घालून सुरक्षित केली जाणार आहे. यासाठी ऑपरेशन अलर्ट सुरु करण्यात आले आहे. अतिरिक्त महासंचालक (एडीजी) रवी गांधी यांनी ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यासाठी दक्षिण बंगाल फ्रंटियरचा दौरा केला आहे. दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी सीमा गस्त आणि इतर देखरेख वाढविली जाईल.

(हेही वाचा Bangladesh मध्ये हिंदू विद्यार्थ्याची हत्या; १२ कट्टरपंथींनी विद्यार्थ्याची हत्या केल्याची स्थानिकांची माहिती)

बीएसएफचे जवान सीमेवर तैनात केले जाणार आहेत. जेणेकरून घुसखोरी किंवा दहशतवादी कायवाया रोखल्या जातील. नुकताच पाकिस्तानच्या प्रमुख लष्करी संस्थांच्या अधिकाऱ्यांनी बांगलादेशच्या (Bangladesh) सीमेवर दौरा केला होता. हा भाग भारतासाठी खूप महत्वाचा आहे. भारताचा चिकन नेक भाग हा उर्वरित सेव्हन सिस्टर राज्यांना देशाशी जोडतो. या भागात पाकिस्तानी अधिकाऱ्यांना घेऊन बांगलादेशी अधिकारी गेल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या राज्यांवर चीनचा डोळा आहे. यामुळे हे तीन देश मिळून भारताविरोधात कारस्थाने रचण्याची शक्यता आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.