- सुजित महामुलकर
मुंबई महापालिका निवडणूक ‘फिव्हर’ दिसू लागला आहे. मुंबईकडे (Mumbai) फारसे लक्ष न दिलेल्या आणि दहाचा आकडा कधी पार न केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षानेही मुंबई महापालिकेकडे आपला मोर्चा वळवला आहे. मुंबईत किमान ३०-४० नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्ट राष्ट्रवादी कॉंग्रेसने ठेवले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
(हेही वाचा – IRCTC Travel Insurance : आयआरसीटीसी प्रवास विमा कसा काम करतो?)
महापालिकेवर आयुक्त प्रशासक
मुंबईत (Mumbai) एकूण २२७ प्रभाग असून प्रभाग पुनर्रचना करण्यात आली. हा पुनर्रचनेचा विषय न्यायप्रविष्ठ असून त्यावर लवकरच निकाल येणे अपेक्षित आहे. गेल्या महापालिकेची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपली असून तेव्हापासून महापालिकेवर आयुक्त प्रशासक म्हणून काम करीत आहेत.
(हेही वाचा – Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची वार्ता! ‘एक्स’च्या माध्यमातून मंत्री अदिती तटकरे यांनी केली ‘ही’ घोषणा)
पाय पसरण्याची तयारी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मुंबईत यापूर्वी कधीही पालिका निवडणूक गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे पक्षवाढीला मुंबईत (Mumbai) कधी चालना मिळाली नाही आणि पक्ष केवळ ‘तोंडी’ लावण्यापूरताच राहीला. अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी बंड केले आणि राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेतला. त्यानंतर होणारी ही पहिलीच महापालिका निवडणूक असेल. पक्षातूनही अजित पवार यांच्यावर मुंबईवर (Mumbai) लक्ष देण्यासाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) यांचा पक्ष भाजपासोबत युती करून आपले पाय पसरण्यासाठी तयारी करत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
(हेही वाचा – जरांगेंच्या आंदोलनाला पूर्वीसारखी धार नाही; Vijay Wadettiwar यांची टीका)
आठ नगरसेवक
गेल्या २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे २२७ पैकी केवळ ९ नगरसेवक म्हणून निवडून आले होते तर काही महिन्यातच एकाचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने नगरसेवक संख्या आणखी कमी होऊन आठ झाली.
(हेही वाचा – Republic Day : महाराष्ट्रातील 48 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर)
मुस्लिमबहुल भागावर लक्ष
महायुतीचा भाग असलेल्या राष्ट्रवादीकडून मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली असून मुंबईतील मुस्लिमबहुल भागात ज्या ठिकाणी भाजपा-शिवसेनेचा मतदार नाही अशा ठिकाणी पक्ष वाढवण्याचे नियोजन पक्षाकडून करण्यात येत असल्याचे समजते. भायखळा, भेंडी बाजार, गोवंडी, शिवाजी नगर, वडाळा अशा काही भागात मुस्लिम पॉकेट्स असून या भागातील किमान ३०-४० प्रभागांवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार राष्ट्रवादीकडून केला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community