मुंबई उपनगरातील एका शाळेत बॉम्ब ठेवल्याचा ईमेल (Fake email) पाठवण्यात आला आहे. या घटनेने शाळेत मोठी खळबळ निर्माण झाली आहे. मुंबईतील कांदिवली परिसरात ही शाळा आहे. धमकीच्या ईमेलची (Threatening email) माहिती मिळताच शाळा प्रशासनाने याची माहिती पोलिसांना दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत असे धमकीचे मेल येत आहेत. काही दिवसांपूर्वीच आरबीआयला (RIB) देखील अशाप्रकारचा धमकीचा मेल आला होता. (Mumbai School Bomb Threat)
(हेही वाचा – Hotstar : “मराठी भाषेची कॉमेंट्री का असू नये?” मराठी समालोचन वरुन हॉटस्टारच्या कार्यालयात मनसेचा राडा)
शाळा प्रशासनाने पोलिसांना बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांचे बॉम्बशोधक पथक (Bomb Squad) शाळेत दाखल झाले. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना घरी पाठवण्यात आले. बॉम्बशोधक पथक तपास करत आहे. दरम्यान स्थानिक पोलिसांनी श्वान पथकासह (BDDS) कांदिवली एज्युकेशन सोसायटी (Kandivali Education Society) शाळा आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये बॉम्ब शोधण्यासाठी तसेच निकामी करण्यासाठी कसून शोध घेतला. परंतु त्यांना काही संशयास्पद आढळले नाही आणि संबंधित मेल खोटा असल्याची माहिती घोषित करण्यात आली. अशी माहीती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. काही दिवसांपासून दिल्लीमध्येही एकाच वेळी अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याचा धमकीचा ईमेल आला होता. यानंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना घरी पाठवून दिले.
(हेही वाचा – Basilica of Bom Jesus : गोव्यातील “बॉम जीझसची बॅसिलिका” चे वैशिष्ट्य काय आहे?)
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 23 जानेवारीला जोगेश्वरी-ओशिवरा भागातील एका शाळेत अशीच घटना घडली होती. शाळेलाही असाच एक ईमेल आला होता, ज्यामध्ये पाठवणाऱ्याने दावा केला होता की अफझल टोळीच्या सदस्यांनी शाळेच्या परिसरात स्फोटके पेरली होती. मात्र नंतर तपास केला असता ही बातमी खोटी असल्याचे निष्पन्न झाले. याआधीही दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र चौकशी केली असता ही बातमी खोटी निघाली.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community