Suicide : विक्रोळीत ‘एक दुजे के लिए’; प्रेमीयुगुलाची एक्सप्रेससमोर उडी घेत आत्महत्या

214
Suicide : विक्रोळीत 'एक दुजे के लिए'; प्रेमीयुगुलाची एक्सप्रेससमोर उडी घेत आत्महत्या
  • प्रतिनिधी

भांडुपमध्ये राहणाऱ्या प्रेमीयुगुलाने गरीबरथ एक्सप्रेस समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी विक्रोळी येथे घडली. यामध्ये प्रेयसी १५ वर्षाची असून प्रियकर २० वर्षाचा आहे. मुलीच्या घरच्यांचा प्रेमाला विरोध असल्यामुळे रविवावरी सकाळी हे दोघे घरातून पळून गेले होते. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या आत्महत्या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. (Suicide)

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विक्रोळी रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट ट्रॅक जवळ दोन मृतदेह आढळून आले होते. एक मृतदेह तरुणाचा आणि दुसरा मृतदेह अल्पवयीन मुलीचा होता. कुर्ला रेल्वे पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन राजवाडी येथे शवविच्छेदनासाठी पाठवून मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी चौकशी सुरू केली असता, भांडुप पोलीस ठाण्यात १५ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल असल्याची माहिती मिळाली. (Suicide)

(हेही वाचा – Mumbai School Bomb Threat: मुंबईच्या ‘या’ शाळेत बॉम्बची धमकी; बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले, पण…)

दरम्यान, रेल्वे पोलिसांनी भांडुप पोलिसांशी संपर्क साधून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असून दोन्ही मृतदेह भांडुप पश्चिम येथील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांच्या नातलगांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडुप येथे राहणारा नितेश तंगडपल्ली (१९) याचे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र मुलीच्या घरच्यांचा दोघांच्या प्रेमाला विरोध होता. मुलीचे कुटुंब मुलीला गावी पाठविण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यान, दोघांनी पळून जाण्याचा निश्चय केला आणि रविवारी सकाळी मुलीने घरी खोटं सांगून घराबाहेर पडली, आणि प्रियकर नितेशला येऊन भेटली. (Suicide)

दरम्यान मुलीच्या कुटुंबांला मुलगी पळून गेल्याची कुणकुण लागताच त्यांनी भांडुप पोलीस ठाणे गाठले आणि नितेश विरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे कळताच पळून गेलेल्या दोघांनी एकत्र जीवन संपविण्याचे ठरवून दोघे विक्रोळी रेल्वे स्थानकात आले तेथून काही दूर रेल्वे रुळावरून दोघे चालत गेले. दरम्यान समोरून येणाऱ्या गरीबरथ एक्सप्रेस समोर दोघांनी स्वतःला झोकून आत्महत्या केली अशी माहिती समोर आली. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. (Suicide)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.