दिल्लीत सुरु असलेल्या किसान युनियनच्या आंदोलनामागील खराखुरा राष्ट्रदोही चेहरा उघडकीस येणारे अनेक साक्षी पुरावे मिळाले आहेत. या आंदोलनाला खलिस्तान्यांचे समर्थन आहे याचा आणखी एक ढळढळीत पुरावा मिळाला आहे. याठिकाणी किसान युनियनच्या नेत्यांपैकी एक रुलदू सिंह मनसा हे भाषणात मनमोकळेपणाने मते मांडत होते, भाषणाच्या शेवटी मात्र त्यांनी खलिस्तान्यांचा कडक शब्दांत विरोध केला. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याचाही कडाडून विरोध केला. त्याची त्यांना शिक्षा भोगावी लागली.
संयुक्त किसान मोर्चा हे शिखांच्या ३२ युनियनचे संघटन आहे, जे दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करत आहे. त्यांचे एक नेता रुलदू सिंह मनसा यांनी २१ जुलै रोजी भाषण दिले. व्यासपीठावरून खलिस्तानी, सिख फॉर जस्टीसचा दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू आणि जनरल सिंह भिंडरवाले यांचा कडाडून विरोध केला. त्यांची मते किसान युनियनच्या नेत्यांच्या पचनी पडली नाही.
खलिस्तानी शक्ती आंदोलनात घुसखोरी करत आहेत. ते अमेरिकेत बसलेले आहेत, मी त्यांचा उल्लेख कुत्रा असाच करतो. ज्यांना भाड्याने घेतले आहे. ते भुंकत राहतात. परंतु आम्हाला माहित आहे कि अमृतसरमध्ये बसून एक व्यक्ती तरुणांची माथी भडकावत होता. त्यामुळे आपले २५ हजार तरुण पोलिसांच्या हातून ठार झाले होते. आता हा पन्नू नावाचा कुत्रा भुंकत आहे. हे करा, ते करा, असे सांगतोय. माझ्या मित्रांनो, तुम्ही तिकडे डॉलर कमावत आहात, इथे या तुम्हाला लढाईचे वास्तव समजेल. दूर बसून सल्ले देणे सोपे असते.
– रुलदू सिंह मनसा
( हेही वाचा : शिखांमध्ये पसरतोय’ लव्ह जिहाद’! खलिस्तानींच्या आडून भारतीय शीख लक्ष्य!)
रुलदू सिंह मनसा निलंबित!
मनसाने एकूण १० मिनिटे भाषण दिले होते, ज्यामध्ये केवळ शेवटचे ४५ सेकंद खलिस्तानींचा समाचार घेतला होता. तर ९ मिनिटे ३० सेकंदपर्यंत केंद्र सरकारला फटकारले होते. मात्र यातील खलिस्तानींचा विरोध करणारे ४५ सेकंदांचे भाषण मात्र किसान युनियनच्या ३२ संघटनांसाठी पोटदुखीचे ठरले. त्यामुळे शिखांच्या भावना दुखावल्या असे सांगत किसान युनियनचे नेते हरिंदर सिंह लखोवाल, जगजीत सिंह दल्लेवाल यांनी संयुक्त किसान मोर्चाची बैठक बोलावून रुलदू सिंह मनसा यांना १५ दिवसांसाठी निलंबित केले. या काळात रुलदू सिंह मनसा हे किसान युनियनचा व्यासपीठावर राहू शकत नाहीत. रुलदू सिंह मनसा हे पंजाब किसान युनियनचे अध्यक्ष आहेत आणि ऑल इंडिया किसान महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
गुरनाम सिंह चढुनी यांच्यावरही कारवाई
हरियाणा भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चढुनी यांना याआधी ७ दिवसांसाठी निलंबित केले होते. त्यांच्यावर राजकीय भाषणबाजी केल्याचा आरोप लावण्यात आला होता. चढुनी यांनी ‘जर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर चर्चा होते, तर पंजाबच्या निवडणुकीचाही विषय चर्चेला आला पाहिजे’, असे म्हटले होते.
(हेही वाचा : भारतविरोधी दहशतवादी संघटनांचे विध्वंसक ‘कारनामे’!)
Join Our WhatsApp Community