Ind vs Eng, 3rd T20 : इंग्लंड विरुद्ध मलिकेतून नितिश कुमार दुखापतीमुळे बाद, गंभीरसाठी इशारा?

खेळाडूंच्या दुखापतीचं व्यवस्थापन नीट होत नसल्याची तक्रार होते आहे.

53
Ind vs Eng, 3rd T20 : इंग्लंड विरुद्ध मलिकेतून नितिश कुमार दुखापतीमुळे बाद, गंभीरसाठी इशारा?
Ind vs Eng, 3rd T20 : इंग्लंड विरुद्ध मलिकेतून नितिश कुमार दुखापतीमुळे बाद, गंभीरसाठी इशारा?
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंड विरुद्घच्या दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी काही तास आधी अष्टपैलू खेळाडू नितिश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) दुखापतीमुळे संघातून बाद झाला. आता उर्वरित मालिका तसंच एकदिवसीय मालिकेतही तो खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता भारतीय संघातील खेळाडूंच्या दुखापतीचं व्यवस्थापन हा नवीन मुद्दा समोर आला आहे. त्यासाठी माजी खेळाडूंनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला जबाबदार धरलं आहे.

रेड्डी (Nitish Kumar Reddy) कोलकाताचा पहिला सामना खेळला होता. पण, त्यात त्याने गोलंदाजी केली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बोर्डर – गावसकर मालिका मात्र तो खेळला. यात पर्थ कसोटीत संस्मरणीय शतकही झळकावलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी नवखा असलेल्या नितिशला नीट वापरलं गेलं नाही, असा आरोप आता माजी खेळाडू आकाश चोप्राने (Aakash Chopra) केला आहे.

(हेही वाचा – Ind vs Eng, 3rd T20 : ‘मोहम्मद शमी तंदुरुस्त आहे पण…’ प्रशिक्षकांनी सांगितलं शमीला न खेळवण्याचं कारण)

‘नितिश कुमार (Nitish Kumar Reddy) जायबंदी आहे. आणि तो उर्वरित मालिका खेळू शकणार नाहीए. अशावेळी माझ्या मनात प्रश्न येतो. नेमकं काय झालं असावं? तरुण खेळाडू दुखापतग्रस्त का झाला? आंतरराष्ट्रीय सामने खेळणं ही वेगळी गोष्ट आहे. त्यासाठीचं तंदुरुस्तीचं नियोजनही वेगळं असतं. त्याची समज कुणी नितिशला दिली नाही का? हे काम मुख्य प्रशिक्षकाचंच आहे,’ असं आकाश चोप्रा (Aakash Chopra) आपल्या युट्यूब वाहिनीवर म्हणाला. (Ind vs Eng, 3rd T20)

ऑस्ट्रेलियात तो पाच कसोटी सामने खेळला. यात त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीही केली. अशावेळी त्याची दुखापत अशी अचानक कशी उद्भवली, असा सवाल आकाशने केला आहे. ‘काहीतरी झालं आहे. किंबहुना, काहीतरी चुकलं आहे. आणि नितिश इतका नवीन आहे की, त्याला दोष नाही देता येणार. त्याला कुणीतरी या गोष्टी सांगितल्या पाहिजेत,’ असं आकाश याविषयी म्हणाला. (Ind vs Eng, 3rd T20)

सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघ २-० ने पुढे आहे. आणि तिसरा टी-२० (Ind vs Eng, 3rd T20) सामना मंगळवारी २८ जानेवारी रोजी राजकोटला होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.