Smriti Mandhana : स्मृती मानधना आयसीसीची सर्वोत्तम महिला एकदिवसीय खेळाडू

स्मृतीने १३ डावांमध्ये ७४७ धावा केल्या आहेत.

47
Smriti Mandhana : स्मृती मानधना आयसीसीची सर्वोत्तम महिला एकदिवसीय खेळाडू
Smriti Mandhana : स्मृती मानधना आयसीसीची सर्वोत्तम महिला एकदिवसीय खेळाडू
  • ऋजुता लुकतुके

भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) आयसीसीची सर्वोत्तम महिला एकदिवसीय खेळाडू होण्याचा मान यंदा पटकावला आहे. २०२४ मध्ये तिची कामगिरी होती १३ डावांमध्ये ७४७ धावा. इतर महिला खेळाडूंपेक्षा तिची कामगिरी सरस होती. निकटची प्रतिस्पर्धी लॉरा वोलवर्ट (६९७) ला तिने मागे टाकलं. तर टॅमी ब्युमाँट (५५४) आणि हेली मॅथ्यूज (४६९) यांच्या ती कितीतरी पुढे होती.

२०१८ मध्येही मानधनाने (Smriti Mandhana) हा पुरस्कार पटकावला होता. पण, यंदा तिची कामगिरी आधीपेक्षा सरस आहे. एका वर्षांत ७०० पेक्षा जास्त धावा तिने पहिल्यांदाच केल्या आहेत. यात तिची सरासरी आहे ५८ धावांची. तर स्ट्राईक रेट आहे ९५ धावांचा. तर २०२४ मध्ये एकदिवसीय प्रकारात तिने ४ शतकं ठोकली आहेत. आणि महिला क्रिकेटमध्ये हा विक्रम आहे.

(हेही वाचा – प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवर पुन्हा एकदा Stone Pelting; झाशी येथून जाणाऱ्या रेल्वेत घडली घटना)

(हेही वाचा – Donations to Political Parties : राजकीय पक्षांवर देणग्यांचा वर्षाव, भाजपाच्या देणग्यांमध्ये ८७ टक्क्यांनी वाढ)

वर्षाची सुरुवात मानधनासाठी धिमी होती. पण, जून महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) तिची बॅट तळपली. तीन सामन्यांच्या मालिकेत तिने लागोपाठ दोन शतकं लगावली. तिसऱ्या सामन्यातही तिने ९० धावा केल्या. ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुदध अहमदाबाद इथं तिने तिसरं शतक झळकावलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वॅका इथं तिने १०९ चेंडूंत शतक झळकावलं. हा सामना भारताने गमावला. पण, मानधनाची कामगिरी लक्षवेधी ठरली. मानधनाने या सामन्यात १४ चौकार आणि १ षटकार ठोकला. आणि इतर भारतीय फलंदाज मिळून फक्त ७ चौकार लगावू शकले.

वर्षाच्या शेवटी वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका भारताने जिंकली. यातही मानधनाने (Smriti Mandhana) दोन अर्धशतकं ठोकली. तिचं शतक मात्र हुकलं. या कामगिरीच्या जोरावर ती अव्वल ठरली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.