astronauts sunita williams : कोण आहेत सुनीता विल्यम्स? अंतराळ मोहिमेतील काय आहे त्यांचे योगदान?

64
astronauts sunita williams : कोण आहेत सुनीता विल्यम्स? अंतराळ मोहिमेतील काय आहे त्यांचे योगदान?

सुनीता विल्यम्स ह्या एक अमेरिकन अंतराळवीर, निवृत्त यू.के. नौदलातल्या अधिकारी आणि आठ अंतराळयान आणि एकूण ५६ तास ४० मिनिटे अंतराळात फिरणाऱ्या सर्वात अनुभवी अंतराळवीर आहेत. विल्यम्स यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात मोहीम १४ आणि मोहीम १५ च्या सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. (astronauts sunita williams)

२०१२ साली त्यांनी मोहीम ३२ वर फ्लाइट इंजिनिअर आणि नंतर मोहीम ३३ च्या कमांडर म्हणून काम केलं. २०२४ साली त्या बोईंग स्टारलाइनरच्या पहिल्या क्रू मिशन बोईंग क्रू फ्लाइट टेस्टवर आयएसएसमध्ये परतल्या होत्या. त्यांचं पृथ्वीवर परतणं हे मार्च २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आलं आहे. त्यामुळे ऑगस्ट २०२४ ते मार्च २०२५ पर्यंत सुनीता विल्यम्स आणि सहकारी अंतराळवीर बी. विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग आणि देखभालीची कामं करण्यासाठी सज्ज आहेत. (astronauts sunita williams)

(हेही वाचा – Budget 2025 : अमेरिकेत नवीन ट्रंप प्रशासनात आयकर रद्द होण्याच्या वाटेवर?)

व्यावसायिक क्रू कार्यक्रम

जुलै २०१५ साली नासाने विल्यम्स यांना अमेरिकेच्या व्यावसायिक अंतराळ उड्डाणांसाठी पहिल्या अंतराळवीरांपैकी एक म्हणून घोषित केलं. त्यानंतर त्यांनी बोईंग आणि स्पेसएक्ससोबत त्यांच्या व्यावसायिक क्रू वाहनांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी, इतर निवडक अंतराळवीरांसह काम करण्यास सुरुवात केली. ऑगस्ट २०१८ साली त्यांना बोईंग CST-१०० स्टारलाइनरच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरच्या पहिल्या ऑपरेशनल मिशन फ्लाइट (स्टारलाइनर-१) मध्ये नियुक्त करण्यात आलं. (astronauts sunita williams)

१८ एप्रिल २०२२ साली नासाने सांगितलं की, बॅरी विल्मोर, मायकेल फिन्के आणि विल्यम्ससह स्टारलाइनर अंतराळवीरांपैकी कोणता कॅडर बोईंग क्रू फ्लाइट टेस्ट (CFT) मिशनवर किंवा पहिल्या ऑपरेशनल स्टारलाइनर मिशनवर उड्डाण करेल हे अद्याप निश्चित झालेलं नाही. त्यानंतर पुढे १६ जून २०२२ साली नासाने पुष्टी केली की CFT हे दोन व्यक्तींचे मिशन असेल, ज्यामध्ये विल्मोर आणि विल्यम्स यांचा समावेश असेल. मग ५ जून २०२४ साली स्टारलाइनरने कक्षेत प्रवेश केला तेव्हा विल्यम्स ऑर्बिटल स्पेसक्राफ्टच्या उड्डाण चाचणीत उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. या मोहिमेत सुनीता विल्यम्स यांनी अंतराळयानामध्ये पायलट म्हणून काम केलं. (astronauts sunita williams)

(हेही वाचा – प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवर पुन्हा एकदा Stone Pelting; झाशी येथून जाणाऱ्या रेल्वेत घडली घटना)

१६ जानेवारी २०२५ पर्यंत बोईंग स्टारलाइनरच्या सेवा मॉड्यूलमधल्या तांत्रिक समस्यांमुळे ती सहकारी अंतराळवीर बॅरी विल्मोरसोबत आयएसएस स्पेस स्टेशनवर अडकल्या आहेत. त्यांची ही मूळ अंतराळ ट्रिप आठ दिवसांच्या कालावधीसाठी नियोजित होती. या मोहिमेपूर्वी सुनीता विल्यम्स या २४ ऑगस्ट २०२४ साली मोहिमेसाठी जाण्याची शक्यता असणाऱ्या टॉप ३० मध्ये आल्या. यावर्षी २०२५ साली त्या परतल्यावर टाइम-इन-स्पेस कालावधीत टॉप १२ मध्ये असण्याची अपेक्षा आहे. सप्टेंबर २०२४ साली सुनीता विल्यम्स यांनी आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा आयएसएसची कमान स्वीकारली आहे. (astronauts sunita williams)

स्पेसवॉक

या महिन्यात म्हणजेच जानेवारी २०२५ पर्यंत सुनीता विल्यम्स यांनी एकूण ५६ तास ४० मिनिटे स्पेसवॉक केलं होतं. सुनीता विल्यम्स या सर्वांत अनुभवी स्पेसवॉकर्सच्या यादीत अकराव्या स्थानावर आहेत. (astronauts sunita williams)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.