Tata Steel Chess : उझबेक ग्रँडमास्टर याकुबायेवचा आर वैशालीशी हस्तांदोलनाला नकार

Tata Steel Chess : धार्मिक गैरसमजातून हा प्रकार घडल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे.

142
Tata Steel Chess : उझबेक ग्रँडमास्टर याकुबायेवचा आर वैशालीशी हस्तांदोलनाला नकार
  • ऋजुता लुकतुके

नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या प्रतीष्ठेच्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत मंगळवारी (२८ जानेवारी) एक वादग्रस्त प्रसंग घडला. भारताची आर वैशालीचा मुकाबला उझबेकिस्तानची ग्रँडमास्टर नोदिरबेक याकुबायेवशी होता. चौथ्या फेरीचा सामना सुरू होण्यापूर्वी वैशालीने प्रथेप्रमाणे याकुबायेवशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला आणि याकुबायेवने मात्र काहीही प्रतिसाद न देता थंडपणे तो खुर्चीत बसला. चेसबेससह इतर वेबसाईटने हा प्रसंग दाखवला आणि तो व्हायरलही झाला. पण, त्यानंतर उझबेक खेळाडूने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि ‘धार्मिक समजातून हा प्रकार घडला. प्रतिस्पर्धी खेळाडूचा अनादर करायचा नव्हता,’ असं त्याने स्पष्ट केलं. (Tata Steel Chess)

काही काळ स्पर्धेच्या ठिकाणी या प्रसंगामुळे खळबळ माजली होती. वैशालीही या प्रतिसादामुळे काहीशी व्यथित झालेली दिसली. पण, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याकुबायेवने झालेला प्रकार स्पष्ट करून सांगितला. त्याच्या धर्मपद्धतीनुसार, एक पुरुष परस्त्रीला स्पर्श करत नाही, असं तो म्हणाला. (Tata Steel Chess)

(हेही वाचा – न्यायाधिकरणातील रिक्त पदे कधी भरणार? High Court ची राज्य सरकारला विचारणा)

याकुबायेवने एक ट्विट करून आपली भूमिका सविस्तरपणे मांडली आहे. ‘सामन्याच्या वेळी काय झालं ते मला सांगायचं आहे. धार्मिक कारणांमुळे मी स्त्रीला स्पर्श करत नाही, याची मी तुम्हाला जाणीव करून देऊ इच्छितो. बाकी सर्व महिला व भारतीय खेळाडूंप्रती मला आदरच आहे. वैशाली व तिच्या भावाने बुद्धिबळ क्षेत्रात चांगलं नाव कमावलंय आणि ते भारताचे स्टार आहेत. पण, मला जे करायचं होतं, ते मी केलं. मी माझी मतं दुसऱ्यांवरही लादणार नाही. पण, मला जसं धर्मपालन करायचं आहे, तसं मी करत राहणार,’ असं नंतर याकुबायेवने म्हटलं आहे. त्याच संदेशात त्याने गैरसमजाबद्दल वैशालीची माफीही मागितली आहे. (Tata Steel Chess)

(हेही वाचा – Budget 2025 : अमेरिकेत नवीन ट्रंप प्रशासनात आयकर रद्द होण्याच्या वाटेवर?)

२४ वर्षीय याकुबायेवचा या सामन्यात पराभव झाला आणि सामना संपल्यानंतर पूर्वानुभवामुळे वैशालीने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला नाही. पण, त्यानंतर याकुबायेवने आणखी एक ट्विट केलं. ‘मी हस्तांदोलन करणार नाही, असं मी पुढील खेळाडूला आधीच सांगितलं आणि तिची त्याला हरकत नव्हती. हेच मी वैशालीसोबत करायला हवं होतं. मला कुणीतरी असंही सुचवलं की, भारतात हात जोडून नमस्ते करण्याची पद्धत आहे. पुढच्या वेळी मी तसं करेन,’ असं याकुबायेव नवीन ट्विटमध्ये म्हणाला आहे. (Tata Steel Chess)

याकुबायेव हा कट्टरपंथीय मुस्लीम आहे. यापूर्वी त्याने दिव्या देशमुख बरोबरच्या सामन्यापूर्वी हस्तांदोलनाला नकार दिला होता. इथून पुढे प्रतिस्पर्धी खेळाडू महिला असेल, तर तिला आधीच आपल्या रिवाजाची कल्पना देऊ असं त्याने सामन्यानंतर म्हटलं आहे. सध्या खुल्या गटात वैशालीचे ४ तर याकुबायेवचे ३ गुण आहेत. स्पर्धेच्या आणखी ५ फेऱ्या बाकी आहेत. (Tata Steel Chess)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.