महायुतीच्या सरकारने मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. अटल सेतूवर (Atal Setu Toll Tax) प्रवास करत असाल तर राज्य मंत्रिमंडळाचा हा निर्णय फक्त तुमच्यासाठी गुड न्यूज ठरणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी 28 जानेवारी 2025 रोजी अटल सेतूबाबत मोठा निर्णय घेतला. पुढील एक वर्ष अटल सेतूवरील टोल टॅक्स वाढणार नाही, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
वास्तविक, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet meeting) झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र सरकारने शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूसाठी 250 रुपये टोल टॅक्स आणखी वर्षभर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. पुढील एक वर्ष येथे टोल वाढवला जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
(हेही वाचा –जीबीएस आजाराबाबत सरकार सतर्क; सार्वजनिक आरोग्य मंत्री Prakash Abitkar यांचे प्रतिपादन)
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात अटल सेतू बांधण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) चे उद्घाटन केले. ज्याला ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ (Atal Bihari Vajpayee Shivdi-Nhava Sheva Atal Setu) असे नाव देण्यात आले आहे. हे 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आले आहे.
(हेही वाचा – हिंदू देवता आणि वीर सावरकरांचा अवमान केल्याबद्दल Rana Ayyub यांच्यविरोधात गुन्हा दाखल करण्याचा दिल्ली न्यायालयाचा आदेश)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community