देशात कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरली तरीही मागीलप्रमाणे तीच चूक करण्याची हिम्मत आता ना केंद्र करणार ना राज्य सरकार करणार, म्हणूनच तर मुंबई रुग्णसंख्या कमालीची घटली, तरीही लोकल सेवा सर्व सामान्यांसाठी सुरू करण्यावर अद्याप राज्य सरकार निर्णय घेत नाही. कारणही तसेच आहे, आता युरोपसह ऑस्ट्रेलिया आणि चीनमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात मागील आठवड्यात जेवढी रुग्ण संख्या होती, त्याच्या डबल रुग्ण संख्या एका आठवड्यात झाली आहे.
एका आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट ३.४ टक्के!
साहजिकच तिसऱ्या लाटेची भीती पुन्हा डोके वर काढू लागली आहे. देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या अजूनही ५०० च्या आसपास कायम आहे आणि दुसरी बाब म्हणजे कोरोनाचा प्रसार होण्याचा दर आठवड्यातच दुप्पट झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सोमवारी पॉझिटिव्हिटी रेट ३.४ टक्के इतका नोंदवला गेला, एका आठवड्याआधी हा दर १.६८ टक्के इतका होता. ही संख्या सध्या फार चिंताजनक नसली, तरी ही संख्या घटण्याऐवजी वाढत आहे. ही लक्षणे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची असू शकतात.
देशातील ८ राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १५ टक्के
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्चांक गाठला होता. तेव्हा पॉझिटिव्हिटी दर १८ ते २० टक्के इतका जास्त होता. दुसरी लाट ओसरत असताना २० जुलै रोजी हा दर केवळ दीड टक्के होता. मात्र, मागील सहा दिवसांमध्ये हा दर हळूहळू वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. २६ जुलैपर्यंत हा आकडा १.६८ टक्क्यांवर पोहोचला. देशातील आठ राज्य अजूनही अशी आहेत जिथे हा दर ५ ते १५ टक्क्यांच्या मध्ये होता.
मागील सात दिवसांतील पॉझिटिव्हिटी रेट
- २० जुलै – १.६८ टक्के
- २१ जुलै – २.२७ टक्के
- २२ जुलै – २.४ टक्के
- २३ जुलै – २.१२ टक्के
- २४ जुलै – २.४ टक्के
- २५ जुलै – २.३१ टक्के
- २६ जुलै – ३.४ टक्के
जगभरात कोरोना वाढतोय
ऑस्ट्रेलियामध्ये डेल्टा व्हायरसचे थैमान – ऑस्ट्रेलियामध्ये सध्या कोरोनाबाधित रुग्ण संख्या ३२ हजार ९०० पर्यंत वाढली आहे, तर १ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी डेल्टा व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लसीकरणाचा मंदावलेला वेग यामुळे या ठिकाणी कोणाचा वेग वाढू लागला आहे. येथे वीकेंडला लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याला विरोध होऊ लागला आहे.
चीनमध्ये सामूहिक चाचण्यांना सुरुवात – चीनच्या नानजिंग या शहरामध्ये २५ जुलै रोजी एका दिवसात ७६ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. जानेवारीपासून ही संख्या मोठी आहे. त्यामुळे चीनमध्ये कोरोनाच्या सामूहिक चाचण्या सुरु केल्या आहेत. चीनने कोरोनाला पूर्णतः नियंत्रणात आणले होते, मात्र याच चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागली आहे.
दक्षिण कोरियात रुग्ण संख्या वाढली – दक्षिण कोरियामध्ये रविवार, २५ जुलै रोजी एका दिवसात १ हजार ३१८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशात आतापर्यंत रुग्ण संख्या १ लाख ९० हजार १६६ बनली आहे. म्हणून या देशातही आता चिंतेचे वातावरण बनले आहे.
Join Our WhatsApp Community