Sri Krishna Bridge Borivali : राष्ट्रीय उद्यानाला महापालिकेला द्यावे लागले ८० लाख रुपये

3174
Sri Krishna Bridge Borivali : राष्ट्रीय उद्यानाला महापालिकेला द्यावे लागले ८० लाख रुपये
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

बोरीवली पूर्व येथील श्रीकृष्ण नगरमधील दहिसर नदीवरील वाहतूक पुलाचे विस्तारीकरण व पुनर्बांधणी करण्यात येत असून वन विभागाच्या परवानगीने या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु ही परवानगी वन विभागाने अटी व शर्ती सापेक्ष दिल्यामुळे या पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होत असल्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला वन्यजीव संवर्धन आराखड्याची अंमलबजावणी करण्याकरता ८० लाख रुपये अदा केले जाणार आहे. (Sri Krishna Bridge Borivali)

बोरीवली पूर्व येथील श्रीकृष्ण नगर येथील दहिसर नदीवरील श्रीकृष्ण नगर पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे या जीर्ण पुलाची वाहतूक ताबडतोब बंद करण्यात आली होती. हा पूल अभिनव नगर, श्रीकृष्ण नगर, काजूपाडा आणि पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा हा एकमेव पूल असल्याने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. या पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती न करता महापालिकेने बोरीवली पूर्व रेल्वे स्थानक ते ओंकारेश्वर मंदिरापर्यंत एम. के. गांधी रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या स्कायवॉकच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराकडून या पुलाचे काम हाती घेण्यात आले. (Sri Krishna Bridge Borivali)

(हेही वाचा – Hawkers Action : जे बोरिवलीकरांना जमले ते दादरकरांना कधी जमणार?)

या श्रीकृष्ण नगर पूल हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात येत असल्याने याला ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर या पुलाच्या कामाला सुरुवात केली. परंतु या पुलाच्या विस्तारीकरणाच्या बांधकामाचा काही भाग वन विभागाच्या क्षेत्रात बाधित होत असल्यामुळे या पुलाची बांधणी दोन टप्प्यात हाती घेतली. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मार्ग वाहतकीसाठी मार्च २०२३ रोजी खुला करण्यात आला. तर दुसऱ्या मार्गिकेच्या कामाला ०.०७२८ हेक्टर क्षेत्र वळवण्यासाठी १ ते २४ अटी व शर्तींच्या अधीन राहून तत्वत: मान्यता प्रदान करण्यात आली होती. या अटी व शर्तीच्या अधीन राहून दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या दुसऱ्या टप्प्यातील पुलाचे ९८ टक्के जवळपास पूर्ण झाले आहे. (Sri Krishna Bridge Borivali)

वन विभागाच्या अटी व शर्तीनुसार सल्लागाराने वन्यजीवन संवर्धन आराखडा सादर केला. त्यानुसार कॅमेरा ट्रॅप आणि ए आय आधारीत शमन प्रणाली वापरुन मानवी वन्यजीव संघर्ष व्यवस्थापन करता ३० लाख रुपये, वन्यजीव बचाव वाहन आणि वन्यजीव बचाव उपकरणे आदींसाठी २५ लाख रुपये आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीव अधिवासाच्या संरक्षणासाठी पेट्रोलियम वाहन यासाठी २५ लाख रुपये अशाप्रकार एकूण ८० लाख रुपयांचा आराखडा सादर केला. त्यानुसार महापालिकेच्यावतीने ८० लाख रुपये वन्यजीवन संवर्धन आराखड्याच्या अंमलबजावणीकरता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वन संरक्षक आणि संचालक यांना अदा केले जाणार आहे. महापालिका प्रशासकांच्या मंजुरीनंतर पूल विभागाच्यावतीने याबाबतचा निधी संजय गांधी राष्ट्रीय उद्याला अदा केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Sri Krishna Bridge Borivali)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.