वॅलियंट फेम आयकॉन (Valiant Fame Icon) आणि जिल्हा सैनिक वेल्फेअर (Zilla Sainik Welfare) यांच्या संयुक्त विद्यामाने दि. २८ जानेवारी रोजी ‘नॅशनल अवॉर्ड ऑफ एक्सलन्स, इंडिया’ (National Award of Excellence, India) या विशेष कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतीय सैन्य, नौदल, हवाई दल, मुंबई पोलिस, वाहतूक पोलिस, एनसीसी अधिकारी आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी माझगाव डॉक येथील मुख्य प्रबंधक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यकारणी सदस्य विज्ञानेश मासावकर (Vidnyanesh Masavkar) यांचाही ‘नॅशनल अवॉर्ड ऑफ एक्सलन्स, इंडिया’ (National Award of Excellence, India) हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
( हेही वाचा : एकुलत्या एक मुलीच्या नावे संपूर्ण मालमत्ता करता यावी म्हणून मुस्लिम महिलेला नकोय मुस्लिम लॉ; Supreme Court ने घेतले गंभीर दखल)
याप्रसंगी विज्ञानेश मासावकर (Vidnyanesh Masavkar) म्हणाले की, १५ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगाला जे जमलं नाही ते करून दाखवलं. ‘आयएनएस निलगिरी’ (INS Nilgiri ) आणि ‘आयएनएस वाघशीर’ (INS Vagsheer) या युद्धनौकांचे अनावरण यावेळी करण्यात आले. यातील ‘आयएनएस निलगिरी’ माझ्या आयुष्यातील सहावी युद्धनौका होती, जिच्यासाठी मी मुख्य प्रबंधक म्हणून कार्य केले. गेल्या ११ वर्षात भारताला मी सहा युद्धनौका समर्पित करू शकलो. या सगळ्याची प्रेरणा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यामुळे आज मला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या पराक्रम दिनी हा पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य आहे. यासारखे पुरस्कार मला देशकार्यासाठी प्रेरित करत राहतील, असेही मासावकर (Vidnyanesh Masavkar) म्हणाले.
या कार्यक्रमाला माजी सैनिक कल्याण व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू सोमनाथ बोस, उबाठा शिवसेनेचे आमदार महेश सावंत, आमदार सुनील शिंदे, ‘व्हीएफआय’च्या अंजली साखरे, जिल्हा सैनिक वेल्फेअर प्रांजल जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या पराक्रम दिनाचे औचित्य साधत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Vidnyanesh Masavkar)
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community