School : पाठ्यपुस्तकांमधून वर्कबुकची पाने हटवण्याचा सरकारचा निर्णय

66

विद्यार्थ्यांच्या शाळेच्या (School) दप्तराचा भार कमी करण्यासाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये नोटबुकसारखी पाने समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, या योजनेला अपेक्षित यश न मिळाल्याने आता हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पाठ्यपुस्तके पूर्वीप्रमाणे नोटबुक पानांशिवाय वितरित केली जातील. याबाबत शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे.

शिक्षा व शैक्षणिक सामग्री सर्व व्यापक करण्यासाठी तसेच शाळेच्या (School) दप्तराचा भार कमी करण्यासाठी आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना लेखन साहित्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये नोटबुकचे पानं समाविष्ट करण्यात आली होती. या योजनेला २०२४-२५ पर्यंत सुरू ठेवण्याचा विचार होता.

(हेही वाचा एकुलत्या एक मुलीच्या नावे संपूर्ण मालमत्ता करता यावी म्हणून मुस्लिम महिलेला नकोय मुस्लिम लॉ; Supreme Court ने घेतले गंभीर दखल)

मात्र, योजनेचा आढावा घेतल्यानंतर असे आढळले की, विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेल्या पानांचा अपेक्षित उपयोग करत नाहीत. विद्यार्थ्यांकडून शाळेत स्वतंत्र नोटबुक आणि पाठ्यपुस्तकं दोन्ही आणली जात असल्याचं दिसून आलं. यामुळे ही योजना शैक्षणिक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरत नसल्याचं स्पष्ट झालं. यावर आधारित, आता शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पाठ्यपुस्तकं पूर्वीप्रमाणेच नोटबुक पानांशिवाय वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.