Netaji Subhash Chandra Bose एक सनातनी; सोमनाथ बोस यांचे महत्त्वाचे विधान

71
Netaji Subhash Chandra Bose एक सनातनी; सोमनाथ बोस यांचे महत्त्वाचे विधान
Netaji Subhash Chandra Bose एक सनातनी; सोमनाथ बोस यांचे महत्त्वाचे विधान

येत्या ५० वर्षांत सनातन संस्कृतीला आपण विसरण्याआधी आपण सनातन संस्कृती पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. भारतीयांच्या डीएनएमध्येही सनातन संस्कृती आहे. यासाठी राष्ट्रदोही विचारधारेला हद्दपार करणे गरजेचे आहे. त्यामुळे सनातन संस्कृतीचा आपणही गर्व बाळगला पाहिजे, कारण नेताजी सुभाषचंद्र बोसही एक सनातनी होते, असे विधान नेताजी सुभाष चंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose ) यांचे नातू सोमनाथ बोस (Somnath Bose) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्रमात केले.

देशात परिवर्तनवादी सरकार सत्तेत आहे. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सन्मान मिळवण्यासाठी ७५ वर्षे का लागली, असा सवालही त्यांनी निर्माण केला. सनातन धर्मात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण भारताच्या याचं सनातन संस्कृतीने सर्वांना एका सूत्रात बांधून ठेवले आहे. सनातन धर्मांतील सण, उत्सव आपल्याला बांधून ठेवते. परंतु आता सनातन संस्कृती संपवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. आपल्या सुदैवाने देशात आणि महाराष्ट्रातही सनातन संस्कृती जपणारे सरकार आहे, असेही सोमनाथ बोस म्हणाले.

पाठ्यपुस्तकांमधून वर्कबुकची पाने हटवण्याचा सरकारचा निर्णय

वॅलियंट फेम आयकॉन (Valiant Fame Icon) आणि जिल्हा सैनिक वेल्फेअर (Zilla Sainik Welfare) यांच्या संयुक्त विद्यामाने दि. २८ जानेवारी रोजी ‘नॅशनल अवॉर्ड ऑफ एक्सलन्स, इंडिया’ (National Award of Excellence, India) या विशेष कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतीय सैन्य, नौदल, हवाई दल, मुंबई पोलिस, वाहतूक पोलिस, एनसीसी अधिकारी आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू सोमनाथ बोसही उपस्थित होते.

ce6ab35c ad3a 49a8 9f79 c87da0d8a998

बोस पुढे म्हणाले की, सनातन संस्कृती पराक्रमी वीर निर्माण करते. तरीही आजही आपली सामाजिक संस्कृती ब्रिटीशांच्या नियमांनुसार चालते. भारतात आजही ८० टक्के सनातनी आहेत. आपल्या देशाने जगाला वसुधैव कुटुंबकम, नारी तू नारायणी, अतिथी देवो भव शिकवले. याचं सनातन संस्कृतीमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण आज याचं सनातन संस्कृतीबद्दल कोणीही चर्चा करत नाही. सौदी अरेबिया, युरोपात गीता शिकवली जाते. पण आपल्याकडे सरकारी शाळा गीतेचे शिक्षण का देऊ शकत नाही?, गीतेशिवाय चांगले तत्त्वज्ञान नाही. भारत मातेने अनेक पराक्रमी वीरांना जन्म दिला. तसेच महाराष्ट्राला पराक्रमाचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे भारताला मिळालेले स्वातंत्र्य मागून मिळाले नसून ते भारतीय पराक्रमी वीरांनी मिळवले आहे. ब्रिटीश सत्तेच्या काळात २० हजार ब्रिटीश ४ लाख भारतीय सैनिकांद्वारे भारतावर राज्य करत होते. पण याच ब्रिटीशांनी पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या आझाद हिंद सेनेमुळे देश सोडला, असे बोस म्हणाले. (Netaji Subhash Chandra Bose )

सैनिकांचा सन्मान करण्याची संधी म्हणजे मला मिळालेला मान

WhatsApp Image 2025 01 28 at 10.11.29 PM

दरम्यान माजी सैनिक कल्याण व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले की, सैनिकांचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य. आमच्या साताऱ्या जिल्ह्यात मॅलिटरी आपशिंगे नावाचे एक गाव आहे. मी माझ्या खात्याचा कारभार सांभाळण्याआधी या गावाला भेट दिली. तिथल्या माजी सैनिकांचे, त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून खात्याचा कारभार स्विकारला. तरी या आपशिंगे गावात एक वॉर मेमोरियअल उभारण्याचा मानस असल्याचे ही शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले. त्याचबरोबर सैनिकांचा सन्मान करण्याचे भाग्य मला मिळणे, म्हणजे हा माझाच मान आहे. कारण आम्ही पाच वर्षासाठी आमदार, मंत्री असतो, पण एक सैनिक सैन्याच्या प्रशिक्षणासाठी दाखल झाल्यापासून कायम देशासाठी एक सैनिक असतो, असे गौरवद्गारही देसाई (Shambhuraj Desai) यांनी यावेळी काढले. (Shambhuraj Desai)

या कार्यक्रमाला माजी सैनिक कल्याण व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू सोमनाथ बोस (Somnath Bose), उबाठा शिवसेनेचे आमदार महेश सावंत, आमदार सुनील शिंदे, ‘व्हीएफआय’च्या अंजली साखरे, जिल्हा सैनिक वेलफेअर प्रांजल जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या पराक्रम दिनाचे औचित्य साधत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Vigyanesh Masavkar)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.