Mamata Kulkarni यांना महामंडलेश्वर पदवी धर्मशास्त्रानुसार प्रदान; महंत अनिकेत शास्त्री यांचे महत्वाचे विधान

72

सध्या महाकुंभमेळ्यामध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamata Kulkarni) यांना किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर पदवी प्रदान करण्यात आली, त्यावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मात्र ही नियुक्त धर्म शास्त्रानुसारच करण्यात आली आहे, असे महत्वाचे विधान महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी केले आहे.

काय म्हणाले महंत अनिकेतशास्त्री महाराज? 

धर्मशास्त्रात धर्मपीठ व्यवस्थापणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. जो शुद्ध अंतकरण, जितेंद्रिय, वेद वेदांगाचा ज्ञाता, कुशल योगाभ्यासी, १४ विद्या इत्यादींमध्ये पारंगत असतो तोच धर्मपीठावर बसण्यास योग्य असतो. असे स्पष्ट मत जगदगुरु आदि शंकराचार्यांनी लिहिलेल्या ग्रंथात आपल्याला आढळते, 14 विद्या म्हणजे काय, तर 18 पुराण, न्याय शास्त्र, वैशिषे शास्त्र, वैदिक शास्त्र, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, चार वेद, षडंग, व्याकरण आदि सर्वांचा समुच्चय म्हणजे 14 महाविद्या. या 14 महाविद्यांमध्ये जो पारंगत असतो, त्यालाच धर्मपीठावरती स्थानापन्न होण्याचा अधिकार सांगितला आहे.आज शंकराचार्य ही हिंदू धर्माच्या वैदिक धर्मातील सर्वोच्च पदे आहेत. आदि शंकराचार्यांनी चार पीठे स्थापन केली. या पीठांनी सनातन धर्माच्या वाढीसाठी, प्रत्येकाचा विकासासाठी हिंदू धर्म यथायोग्य पोहचावा यासाठी 10 आखाड्यांची स्थापना केली. याला दशनामी आखाडे म्हणतात. आता त्यात 3 नवीन आखाड्यांची वाढ झाली आहे.

(हेही वाचा Mahakumbh म्हणजे अश्लीलता; श्रीकृष्ण, श्रीराम गुन्हेगार; हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या Nirdesh Singh च्या विरोधात वकील अमिता सचदेवा यांची पोलिसात तक्रार)

शंकराचार्य यांच्यानंतर प्रत्येक आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर असतात. हे आचार्य महामंडलेश्वर त्यांच्या अंतर्गत महामंडलेश्वर नियुक्त करतात, महामंडलेश्वर त्यांच्या अंतर्गत महंत, श्री महंत अशी धार्मिक पदे त्या त्या व्यक्तीच्या योग्यतेनुसार प्रदान करतात. त्यामुळे ही खूप सन्मानाची पदे आहेत. या पदावर यथायोग्य माणूसच नेमला जातो. असा आजपर्यंतचा इतिहास आपल्याला सांगतो. अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamata Kulkarni)  यांना संन्यास दिला आणि लगेच महामंडलेश्वर पद दिले हे पाहताना चुकीचे वाटते पण आम्ही सर्व आखाड्यांसोबत सर्व धर्म शास्त्र अभ्यासकांनी चर्चा केली, तेव्हा आम्हाला किन्नर आखाड्याच्या माध्यमातून सांगण्यात आले कि, गेल्या अडीच वर्षांपासून ममता कुलकर्णी (Mamata Kulkarni)  यांनी वेद शास्त्रांचा विशेष करून उपनिषदांचा अभ्यास केला. त्यांच्या आचार्य महामंडळेश्वरांनी त्यांची परीक्षा घेतली. त्यानंतर जुन्या आखाड्याचे पंच यांनी हा निर्णय घेत ममता कुलकर्णी यांना संन्यास दीक्षा देवून त्यांना महामंडलेश्वर पदी नियुक्त केले  आहे. त्यामुळे ही सर्व घटना धर्मशास्त्राला अनुसरून झाली आहे. त्याबद्दल वाद निर्माण करण्याचे कारण नाही. प्रत्येक सनातन बांधवांनी आपल्या घरात धार्मिक पुस्तके ठेवून त्याचा धर्म शास्त्रीय अभ्यास करणे खूप गरजेचे आहे, असेही महंत अनिकेतशास्त्री महाराज म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.