‘अफवांकडे लक्ष देऊ नका, तुम्ही जिथे आहात त्या घाटावर आंघोळ करा. प्रशासनाने बनवलेल्या नियमांचे पालन करा’ असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथील महाकुंभ येथे आलेल्या भक्तांना केले आहे. महाकुंभमध्ये प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे भाविकांनी संयम आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. (Mahakumbh 2025)
मुख्यमंत्री योगी यांनी भाविकांना विशेषतः संगमाकडे जाण्याचा प्रयत्न न करण्याची आणि जवळच्या घाटावर स्नान करण्याची विनंती केली.
(हेही वाचा – BMC : पूर्व मुक्त मार्गावरील काही भाग खचतो; महापालिकेने घेतला आता ‘हा’ निर्णय)
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, गंगा मातेच्या प्रत्येक घाटावर आंघोळीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे भक्तांनी ज्या घाटाजवळ आहेत, तेथे स्नान करावे आणि संगमाकडे जाण्याचा प्रयत्न करू नये. स्नानाचा हा पवित्र प्रसंग सुरळीत आणि सुरक्षितपणे पूर्ण करता यावा, यासाठी सरकार आणि प्रशासनाने सर्व आवश्यक व्यवस्था केल्या आहेत, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी महाराज ने की श्रद्धालुओं से अपील –
माँ गंगा के जिस घाट के जो समीप है, वहीं स्नान करें, संगम नोज की ओर जाने का प्रयास न करें।
प्रशासन के निर्देशों का अनुपालन करें, व्यवस्था बनाने में सहयोग करें।
किसी भी अफवाह पर ध्यान न दें।
— Yogi Adityanath Office (@myogioffice) January 29, 2025
महाकुंभ येथील संगम घाटावर बुधवारी पहाटे संगम येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत १० हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याचे समजते. मौनी अमावस्येला पवित्र स्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक जमल्यानंतर ही घटना घडली.
मेळ्यातील विशेष कर्तव्यावरील अधिकारी आकांक्षा राणा यांनी सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगम घाटावरील बॅरिकेट्स तुटल्याने काही लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नेमकी संख्या अद्याप आमच्याकडे नाही. (Mahakumbh 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community