प्रयागराजमध्ये (Prayagraj) महाकुंभमेळ्यात (Mahakumbh 2025) दुसऱ्या अमृत स्नानाच्या म्हणजेच मौनी अमावस्येच्या पूर्वी चेंगराचेंगरीची (Mahakumbh Stampede) घटना घडली आहे. रात्री 1 वाजताच्या सुमारास चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. या घटनेत 10 जणांचा मृत्यू तर, अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे आखाडा परिषदेनं मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी (Ravindra Puri) यांनी दिली आहे. (Mahakumbh 2025)
#MahaKumbh2025 | PM Modi spoke to UP CM Yogi Adityanath about the situation at the Maha Kumbh Mela, reviewed the developments, and called for immediate support measures. pic.twitter.com/T5mQCQM7M0
— ANI (@ANI) January 29, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांच्याशी महाकुंभमेळ्यातील परिस्थितीबद्दल चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदींनी कुंभमेळ्यातील घडामोडींचा आढावा घेतला आणि तातडीने मदत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रयागराजमधील सर्व रुग्णालयांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. (Mahakumbh 2025)
#WATCH | #MahaKumbh2025 | Prayagraj, Uttar Pradesh: Drone visuals from the Ghats of Triveni as a huge number of devotees reach for the Amrit Snan on the occasion of Mauni Amavasya. pic.twitter.com/l5cmAn5DdG
— ANI (@ANI) January 29, 2025
जखमींना महाकुंभात बांधलेल्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. सर्व जखमींवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची संपूर्ण टीम रुग्णालयात उपस्थित आहे. जखमींना एअर अॅम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात नेण्याची तयारीही करण्यात आली आहे. सर्व डॉक्टरांना रुग्णालयांमध्ये पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Mahakumbh 2025)
नेमकं काय घडलं ?
जिथं लोक झोपली होती तिथं त्या ठिकाणी मागील बाजूनं लोक आले आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्याचवेळी लाखो लोक संगमाच्या तटावर स्नान करत होते. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका दाखल झाल्या आणि जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरु करण्यात आलं. सर्व भाविकांना संगम घाटावर स्नान करायचं होतं. दुसऱ्या घाटावर स्नान करायला ते तयार नव्हते. त्यामुळं एका ठिकाणी गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाली. यानंतर पळापळ झाली. मिळालेल्या माहितीनुसार 111 ते 122 पोल नंबरमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेतील जखमींना स्वरुप रानी नेहरु रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. (Mahakumbh 2025)
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath appeals to the devotees to take a dip at their nearest ghat and not try to go towards Sangam Nose, follow the instructions of the administration and cooperate with them. He has also asked to not pay attention to any rumours: CMO pic.twitter.com/JEkWUtmNhv
— ANI (@ANI) January 29, 2025
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सातत्यानं जिथं चेंगराचेंगरी झाली आहे त्या संगम घाटावर कोणी जाऊ नये, असं आवाहन केलं आहे. संगम घाटावरुन लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. घटनेच्या साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस लोकांना घाटावरुन बाजूला करत होते. त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. प्राथमिक माहितीनुसार 50 ते 80 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, प्रशासनानं आकडेवारी जाहीर केलेली नाही. (Mahakumbh 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community