Ind vs Eng, 3rd T20 : तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडकडून भारताचा २६ धावांनी पराभव

Ind vs Eng, 3rd T20 : मोहम्मद शमी १४ महिन्यानंतर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला

34
Ind vs Eng, 3rd T20 : तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडकडून भारताचा २६ धावांनी पराभव
Ind vs Eng, 3rd T20 : तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडकडून भारताचा २६ धावांनी पराभव
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर संघाला या प्रकारात पहिली पराभवाची चव चाखायला लावलीय ती बॅझबॉलचे प्रणेते इंग्लिश संघाने. राजकोटमध्ये त्यांनी भारताचा २६ धावांनी पराभव केला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला पहिली फलंदाजी दिली होती. पण, हा डाव इंग्लंडने दमदार सुरुवात करून आणि त्यानंतर अचूक गोलंदाजी करून भारतावरच उलटवला. आधी बेन डकेट २६ चेंडूंत ५१ आणि जोस बटलर २२ चेंडूंत २४ धावा करत इंग्लंडला दमदार सुरूवात करून दिली. डकेट खेळपट्टीवर होता तोपर्यंत इंग्लिश संघ दोनशेच्या पार जाणार असंच वाटत होतं. (Ind vs Eng, 3rd T20)

(हेही वाचा- Mahakumbh 2025 : अफवांकडे लक्ष देऊ नका, जिथे आहात त्या घाटावर स्नान करा; योगी आदित्यनाथ यांचे आवाहन)

हार्दिक पांड्या, मालिकेत पहिल्यांदा खेळणारा शमी तसंच वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिश्नोई यांचा फारसा प्रभाव गोलंदाजीत दिसला नाही. पण, वरुण चक्रवर्तीने दुसऱ्या बाजूने बळी घेणं सुरू ठेवलं. आणि त्यामुळे इंग्लिश डावाला खिळ बसली. वरुणने २४ धावांत ५ बळी मिळवले. पण, जोस बटलर पाठोपाठ लिअम लिव्हिंगस्टोनने २४ चेंडूंत ४३ धावा करताना ५ उत्तुंग षटकार खेचले आणि त्यामुळे इंग्लिश संघ १७१ धावा करू शकला. (Ind vs Eng, 3rd T20)

 राजकोटची खेळपट्टी फलंदाजीला थोडी धिमीच वाटत होती. आणि त्यात इंग्लंडने पहिल्या फलंदाजीचा फायदा उचलत ९ बळींवर १७१ धावा केल्या. आणि त्यानंतर इंग्लिश गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांचे कच्चे दुवे हेरून गोलंदाजी केली. आणि नैसर्गिकरित्या आक्रमक असलेल्या संजू सॅसमन (३) आणि सूर्यकुमार यादव (१४) यांना त्यांनी फटकेबाजीची संधीच दिली नाही. अभिषेक शर्मा २४ तर तिलक वर्माही १४ धावा करून बाद झाला. आणि तिथेच भारताची पिछेहाट झाली. त्यानंतर हार्दिक पांड्याने ३५ चेंडूंत ४० धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, त्यालाही अपेक्षित धावगती राखता आली नाही. आणि त्यामुळे फलंदाजांवरील दडपण वाढतच गेलं. (Ind vs Eng, 3rd T20)

(हेही वाचा- SIM Hacking : सीम हॅकरचा स्टील व्यावसायिकाच्या बँक खात्यावर दरोडा; साडेसात कोटी वळते केले)

शेवटी निर्धारित १० षटकांत भारतीय संघ ९ बळींवर १४५ धावांच करू शकली. भारतासाठी महत्त्वाचं म्हणजे मोहम्मद शमी या सामन्यात खेळला. गोलंदाजीत तो फारशी चमक दाखवू शकला नाही. आणि ३ षटकांत २५ धावा त्याने दिल्या. पण, १४ महिन्यांनंतर शमी आंतरराष्ट्रीय सामन्यात पुनरागमन करत होता. आणि तो पूर्ण वेळ मैदानावर होता ही जमेची बाजू आहे. (Ind vs Eng, 3rd T20)

या मालिकेत आता भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. पुढील सामना ३१ जानेवारीला पुण्यात होणार आहे. (Ind vs Eng, 3rd T20)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.