भाजपा विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षाकडून लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप असल्याने त्यांच्यावर कठोर पावले उचलली जातील, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. (Ranjitsinh Mohite Patil)
(हेही वाचा- Ayodhya : ‘पुढील काही दिवस अयोध्येत येणे टाळा…’, राम मंदिर ट्रस्टने भाविकांना का केले न येण्यासाठी अपील ?)
भाजपाने काही दिवसांपूर्वी मोहिते यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये त्यांच्यावर पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाण्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर, मोहिते यांनी पक्षाला उत्तर दिले असून, त्यांनी कोणतीही पक्षविरोधी भूमिका मांडली नसल्याचा खुलासा केला आहे. मात्र, पक्षाकडे त्यांच्या विरोधात ठोस पुरावे असल्याचा दावा केला जात आहे. (Ranjitsinh Mohite Patil)
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाच्या धोरणाविरोधात काही निर्णय घेतल्याचे किंवा कृती केल्याचे पुरावे पक्ष नेतृत्वाकडे आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत पक्षशिस्त मोडल्याच्या कारणावरून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत चर्चेनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. (Ranjitsinh Mohite Patil)
(हेही वाचा- Tiger Death : वाघांच्या मृत्यूवर आळा घालण्यासाठी वनमंत्र्यांचे कठोर निर्देश)
मोहिते पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते असून, त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपा नेतृत्व या प्रकरणावर काय भूमिका घेते, यावर भविष्यातील राजकीय समीकरणे अवलंबून असतील. (Ranjitsinh Mohite Patil)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community