Award Ceremony : आनंद निधान संस्थेचा समाजभूषण पुरस्कार सोहळा; समाजातील गरजूंना सहाय्य करणार्‍यांचा सत्कार!

82
Award Ceremony : आनंद निधान संस्थेचा समाजभूषण पुरस्कार सोहळा; समाजातील गरजूंना सहाय्य करणार्‍यांचा सत्कार!

शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी मालाड कोळी समाज संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आनंद निधान (Aanand Nidhan Institute) या संस्थेचा समाजभूषण पुरस्कार सोहळा मालाड पश्चिम येथे पार पडला. या वर्षी आनंद निधान संस्थेने समाजात एकल काम करणाऱ्या व्यक्तींचा समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे ठरवले. हा पुरस्कार अशा लोकांना दिला गेला जे एकटे समाजासाठी आगळे वेगळे काहीतरी करतात. आपल्या संवेदनशील मनाच्या जाणिवा जपतात. (Award Ceremony)

या प्रसंगी संस्थेचे किशोर नार्वेकर म्हणाले, “आनंद निधान संस्था गेली सहा वर्ष विविध सामाजिक उपक्रम करत आहे. ही संस्था २०१८ पासून मालाड परिसरातील कर्करोगग्रस्त रुग्ण, तसेच गरीब गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करते. त्याचबरोबर परिसरातील आजी-आजोबांसाठी चिरतरूण वृद्धांचा मनोरंजन कट्टा चालवते आणि आपल्या मालाड परिसरातील नगरपालिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका व संस्कार वर्ग राबवते. विशेष म्हणजे परिसरातील गरजवंत रुग्णांसाठी अल्प दरात होमिओपॅथी दवाखाना सुरू आहे.” (Award Ceremony)

(हेही वाचा – सरकार म्हाडा विभागासाठी नवे धोरण आखणार; बांधकाम मंत्री Eknath Shinde यांची माहिती)

“आनंद निदान संस्था (Aanand Nidhan Institute) ही वेगवेगळ्या वृद्धाश्रमाला तसेच अनाथ आश्रमांना भेट देऊन त्यांना आर्थिक सहाय्य करते. त्याच बरोबर दुष्काळग्रस्त असतील किंवा विकलांग दिव्यांग परिवाराला आर्थिक सहाय्य करत असते. हे करत असताना आपल्या परिसरातील पोलीस, सफाई कामगार, नर्सेस, एसटी कर्मचारी, फायर ब्रिगेड, यांना थँक्स गिविंग कार्यक्रम राबवते.” असेही ते पुढे म्हणाले. (Award Ceremony)

समाजात काम करणार्‍या समाजसेवकांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. “विशाल परुळेकर” हे वज्रेश्वरी रोड येथे साई आधार नावाने अडतीस निराधार मुलांना सांभाळतात. “रमेश सावंत” स्वतः अंध असून ते मुंबईतल्या दिव्यांग बांधवांना मदत करतात. मुंबई परिसरातील अंध अपंग व्यक्तींना ते स्वावलंबी, व सक्षम बनवण्यासाठी मदत करतात. “राधा संपत भोसले” या मालाडच्या मार्वे भागात रस्त्यावरच्या बेवारस ५० ते ६० कुत्र्यांना संभाळतात. त्यांना औषधोपचार करतात. त्यांना पोटच्या मुलासारखं खाऊ घालतात व सांभाळतात. “शारदा अरोंदेकर” अंधेरी ते दहिसर परिसरातील कचरा वेचक महिलांना आधार देतात. त्यांना समाजात मानाने व हक्काने जगता यावं यासाठी त्या प्रयत्न करतात व कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे प्रशिक्षण देऊन पर्यावरण रक्षण देखील करतात. (Award Ceremony)

(हेही वाचा – Shri Chhatrapati Shivaji Maharaj Museum मध्ये प्रवेश करण्यासाठी किती शुल्क आहे?)

“नंदिनी सावे व नितीन सावे” हे उभयंत टाटा हॉस्पिटलमधील कर्करोगग्रस्त मुलांना मदत करतात. त्यांच्या परिवाराला औषधोपचार व मानसिक आधार देतात. “प्रकाश हिरू चव्हाण” रेनबो फाउंडेशनच्या माध्यमातून मुलांना खेळातून प्रशिक्षण देतात. आदिवासी, वंजारी समाजाच्या मुलांना शिक्षणाकडे ओढ लागावी म्हणून ते विविध खेळाच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाकडे वळवतात. तसेच “सुमित गाडे” हे धारावीतील मुलांना गुंडगीरी व व्यसनापासून मुक्त करून त्यांना शिक्षणाकडे वळवतात. विशेष करून मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतात. या दिग्गजांना समाजभूषण देऊन सन्मानित करण्यात आले. (Award Ceremony)

हा समाजभूषण पुरस्कार आनंद निधान (Aanand Nidhan Institute) व कोळी समाज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वरील मान्यवरांना देण्यात आले. या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे मनोवेधक काम जयोस्तु जयेश मिस्त्री या छोट्या मुलाने पाच पांडव एक तांडव नावाचं एकपात्री सादर करून केलं व निवेदिता सावंत यांनी देखील झाशीच्या राणीची जुलेखा हे एकपात्री सादर करून सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. तसेच या कार्यक्रमाची सुरुवात सुरेल गाण्यांनी केली. जगदीश मंत्री व क्षीरसागर मॅडम यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. (Award Ceremony)

(हेही वाचा – Bangladeshi Infiltrators ची माहिती द्या, १,१११ रुपयांचे बक्षीस मिळवा; ‘या’ शहरात लागले बॅनर)

आनंद निधान संस्थेच्या (Aanand Nidhan Institute) सचिव मेधा चंद्रकांत नाईक, आनंद निदान संस्थेच्या खजिनदार दिपाली समीर भाटकर व आनंद निदान संस्थेचे अध्यक्ष संजय कृष्णा सावंत यांनी आपल्या करकमलाने समाजभूषण पुरस्कार प्रदान केले. तसेच मालाड कोळी समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार केणी यांनी समाजाच्या वतीने सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींना सुंदर स्मृतिचिन्ह दिले. या पुरस्काराराचे वाचन अर्चना टिकेकर यांनी केले. पुरस्कार प्राप्त महानुभावांनी आपले ह्रदयद्रावक अनुभव सांगितले. (Award Ceremony)

मालाड कोळी समाज संस्थेच्या अध्यक्षांना आनंद निधानच्या (Aanand Nidhan Institute) प्रमुख मार्गदर्शकांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमांमध्ये समाजातील इतर मान्यवरांनी वर्णी लावली होती. समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव किशोर लट्टू, राजेश पाटील, हरीश जालाल उपस्थित होते. तसेच पांचाळ समाज मध्यवर्ती मंडळाचे सचिव सुधीर करवीर हे देखील उपस्थित होते. डॉक्टर रोहन पाटील उपस्थित होते. तसेच आनंद निधान संस्थेच्या चिरतरूण कट्ट्यावरील सर्व मंडळी उपस्थित होती. या पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर नार्वेकर यांनी आपल्या खुमासदार व ओघवत्या शैलीत केले. शेवटी कुमार सौदीने सुरेल भैरवी सादर केली व कार्यक्रमाची समाप्ती राष्ट्रगीताने करण्यात आली. (Award Ceremony)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.