Shiv Sena UBT चे कुंभमेळा मृत्यू प्रकरणी राजकारण!

101
Shiv Sena UBT चे कुंभमेळा मृत्यू प्रकरणी राजकारण!
  • प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या शिवसेना उबाठाने (Shiv Sena UBT) आता भाजपावर राग काढायला सुरूवात केली. भाजपावर टीका करण्याची एकही संधी शिवसेना उबाठा सोडत नाही. महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीत अपघाती मृत्यू झालेल्या लोकांवरही राजकारण सुरू केल्याने सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशातील महाकुंभमध्ये गंगा घाटावर चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली आहे. मौनी अमावस्येच्या प्रसंगी दुसरे स्नान सुरु असताना ही घटना घडली आणि संगम काठावर झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

(हेही वाचा – यमुनेच्या पाण्यावरून PM Narendra Modi यांनी केजरीवाल यांच्यावर साधला निशाणा;  म्हणाले, यमुनेत विष… )

काँग्रेस-समाजवादी पक्षाचे गोडवे

या दुर्दैवी घेतनेचे शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) प्रवक्ते संजय राऊत यांनी राजकारण सुरू केले. उत्तर प्रदेशातील भाजपा सरकार असल्याने उबाठाने टीका सुरू केली. बुधवारी २९ जानेवारी २०२५ च्या सकाळी पत्रकार परिषदेत राऊत यांनी उत्तर प्रदेश सरकारवर आरोप केले. कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाचे गोडवे गात राऊत यांनी त्यांचे कौतुक केले.

नेहरू, अखिलेशचे कौतुक

“१९५४ मध्ये कुंभ झाला त्याची व्यवस्था पाहा. या कुंभची व्यवस्था कशी आहे, हे पाहण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान नेहरु यांनी कुंभचा दौरा केला होता. तेव्हाचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत तिथे पूर्णवेळ उपस्थित होते,” असे सांगून राऊत पुढे म्हणाले, “अखिलेश यादव जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जी व्यवस्था ही सर्वोत्तम होती,” असेही राऊत यांनी सांगितले.

(हेही वाचा – UPI User: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, १ तारखेपासून होणार ‘हे’ बदल, जाणून घ्या)

व्यवस्था खर्चावर प्रश्न

विद्यमान योगी सरकारने कुंभ आयोजनावर जवळपास १०,००० कोटी रुपये खर्च केले. त्यावरही राऊत यांनी प्रश्नचिन्ह हे पैसे गेले कुठे? कुठे खर्च झाले? असे उपस्थित केले. “१० हजार कोटी रुपये योग्य ठिकाणी खर्च झाले असतील तर लोक दगावले कसे? असा प्रश्न राऊत यांनी विचारला.

जुन्या घटना विसरले

राऊत कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या काळातील अपघात आणि मृत्यू सोयीस्कर विसरले. फेब्रुवारी २०१३ मध्ये अखिलेश यादव यांच्या सरकारच्या काळात कुंभ स्नानानंतर घरी परतताना रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत ३६ लोकांचा बळी गेला होता, तसेच २०२३ मध्ये ३९ मृत्यू, १९९२ मध्ये ५० ठार झाले होते तर १९५४ चा हवाला राऊत यांनी दिला त्या वर्षी ३ फेब्रुवारी या दिवशी चेंगराचेंगरीत ८०० लोकांचे प्राण गेले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.