Uddhav Thackeray यांना धक्क्यावर धक्के देण्याची Shiv Sena ची तयारी?

151

ओबीसी आरक्षण आणि प्रभाग फेररचना याबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मिळालेली पुढील सुनावणीची तारीख पाहता महानगरपालिका निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे. असे असली तरी शिवसेना उबाठाकडून शिवसेनेत (शिंदे) प्रवेश सुरू ठेवण्याचा ओघ कायम ठेवण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुढील काही दिवस उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Shiv Sena)

(हेही वाचा – Assembly Election 2024 : निवडणुकीचा मागोवा घेणारे कॉफी टेबल बुक महापालिकेकडून प्रकाशित)

पहिला धक्का बसला

शिवसेना उबाठाच्या (Shiv Sena UBT) उपनेत्या, माजी नगरसेविका (former corporators) आणि कट्टर शिवसैनिक म्हणून प्रसिध्द असलेल्या राजुल पटेल यांनी सोमवारी २७ जानेवारी २०२५ या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पटेल यांच्या शिवसेना प्रवेशाने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून आणखी २०-२५ माजी नगरसेवक रांगेत असल्याचे सांगण्यात आले.

निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये

ओबीसी आरक्षण आणि प्रभाग फेररचना हे विषय न्यायप्रविष्ठ असून सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) थेट २५ फेब्रुवारी २०२५ या दिवशी पुढील सुनावणी होईल असे जाहीर केल्याने महापालिका निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ पर्यंत पुढे गेल्याचे तज्ञांचे अंदाज आहेत.

(हेही वाचा – Mahakumbh 2025 : महाकुंभात 5 कोटींहून अधिक भाविकांनी केले अमृतस्नान)

माजी नगरसेवक नाराज

शिवसेना ऊबाठाची कार्यपद्धती पटत नसल्याने अनेक नेते (leaders), माजी नगरसेवक (former corporators) नाराज (disappointed) असून शिवसेनेत उडी मारण्याच्या तयारीत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांना एक एक वेगळे धक्के देण्याची रणनीती शिवसेना नेत्यांनी आखल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुढील काही महिने उबाठाला धक्केदेण्याची रणनीती शिवसेना (ShivSena)नेत्यांनी आखल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आलेत्यामुळे पुढील काही महिनेबाठाला धक्के बसणारअशी चिन्हे दिसू लागली आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.