महाडच्या Super Specialty Hospital साठी शासकीय जमीन; चंद्रशेखर बावनकुळे, प्रविण दरेकरांच्या प्रयत्नांना यश

68
महाडच्या Super Specialty Hospital साठी शासकीय जमीन; चंद्रशेखर बावनकुळे, प्रविण दरेकरांच्या प्रयत्नांना यश
  • प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील केंबुर्ली येथील २०० खाटांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी (Super Specialty Hospital) शासकीय जमीन देण्याची मंजुरी शासनाने दिली होती. यासाठी जीआर जारी करण्यात आला होता, परंतु रुग्णालयासाठी ज्या जमिनीवर प्रस्ताव होता, त्या ऐवजी डोंगरावरील जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर भा.ज.प. गटनेते प्रविण दरेकर यांनी आक्षेप घेत या निर्णयाच्या पुनरावलोकनाची मागणी केली. त्यानुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीत त्यांना नवीन जीआर काढण्याची सूचनाही देण्यात आली.

(हेही वाचा – बालगृहातील मुली आणि माजी संस्थाश्रयी महिलांचे प्रश्न तातडीने सोडवा; उपसभापती Dr. Neelam Gorhe यांचे निर्देश )

महाड हे मुंबई-गोवा महामार्गावर असलेले मध्यवर्ती ठिकाण असल्याने महाड उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर या रुग्णालयांना मोठे महत्त्व आहे. महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना रुग्णालयाच्या आधारभूत सुविधांसाठी मुंबई किंवा इतर ठिकाणी जावे लागते. याची दखल घेत प्रविण दरेकर यांनी अधिवेशनात महाडमध्ये २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय (Super Specialty Hospital) उभारण्याची मागणी केली होती.

(हेही वाचा – तपासात दिरंगाई होत असल्याचे कारण देत Bombay High Court ने पानसरे हत्याकांडातील सहा आरोपींना दिला जामीन )

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि ५ सप्टेंबर २०२३ रोजी केंबुर्ली येथील रुग्णालय उभारण्यासाठी शासनाने मंजुरी दिली. त्यानंतर २८ नोव्हेंबर २०२३ रोजी शासन निर्णयही जारी झाला. १४७ कोटी रुपयांच्या प्रशासकीय मंजुरीसह रुग्णालयाच्या कामाला प्रारंभ झाला. केंबुर्ली येथील १५ एकर जमिनीसाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे मागणी करण्यात आली होती, परंतु त्याऐवजी इतर शासकीय जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर दरेकर यांनी आक्षेप घेत महाड उपविभागीय अधिकारी आणि रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून कोकण विभागीय आयुक्तांकडे रुग्णालयासाठी योग्य जमीन देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. मंत्रालयातील बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला (Super Specialty Hospital) योग्य शासकीय जमीन देण्याच्या बाबतीत नवीन शासन निर्णय जारी करावा, अशी सूचना संबंधित विभागाला दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.