नागरिकांच्या सुविधेसाठी वॉटर टॅक्सी, रोप वे, पॉड टॅक्सी सेवेचे पर्याय निर्माण करावे; परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचे निर्देश

48
नागरिकांच्या सुविधेसाठी वॉटर टॅक्सी, रोप वे, पॉड टॅक्सी सेवेचे पर्याय निर्माण करावे; परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचे निर्देश
  • प्रतिनिधी

मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वाहनांच्या संख्येसोबतच प्रवाशांची संख्या देखील प्रचंड वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या परिवहन सेवांना मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबईमध्ये कोणत्या मार्गांवर कोणती अतिरिक्त परिवहन सेवा सुरू करता येईल यावर विचार करून, अधिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी बुधवारी या संदर्भात विचार व्यक्त करत, जास्त वर्दळीच्या ठिकाणी सर्वेक्षण करून नागरिकांच्या सुविधेसाठी अधिक परिवहन सेवा उपलब्ध कराव्यात, असे निर्देश दिले.

आज परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या दालनात एक महत्त्वाची बैठक झाली, ज्यामध्ये वॉटर टॅक्सी, रोप वे, पॉड टॅक्सी यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीला नगरविकास विभागाचे अधिकारी, मेरी टाईम बोर्डाचे अधिकारी, परिवहन आयुक्त, आणि एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – Milan Subway Ground Beautification : सॉकर, बेस बॉल मैदानाच्या दुरुस्तीसह क्रिकेटची खेळपट्टी बनवणार)

परिवहन मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी रोप वे, पॉड टॅक्सी आणि पार्किंगच्या समस्यांवर महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. ते म्हणाले की, रोप वे निर्माण करण्यासाठी एक नवीन यंत्रणा तयार करावी लागेल. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने यासाठी नियम तयार केले जात आहेत. त्याचबरोबर पार्किंग समस्या मोठ्या शहरांमध्ये गंभीर बनली आहे. त्यामुळे मुंबई महागनगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने भूमीगत पार्किंग प्लाझा तयार करण्यासाठी सर्वेक्षण करावे. यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्याचेही त्यांनी सुचवले.

पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या बाबत मंत्री सरनाईक यांनी निर्देश दिले. बांद्रा पूर्व ते कुर्ला दरम्यान 8.8 किलोमीटर अंतर असलेल्या या प्रकल्पामध्ये 38 स्थानके असणार आहेत, आणि प्रत्येक स्टॉप दर 15 सेकंदाने होईल. यासाठी कामाचे नियोजन त्वरित करण्यात यावे, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईच्या वाढत्या वर्दळीला सामोरे जाण्यासाठी प्रभावी उपाययोजना घेतल्या जात आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या या प्रगतीशील सूचनांमुळे मुंबईवासीयांसाठी जास्त सोयीस्कर आणि सुलभ वाहतूक सुविधा मिळण्याचा मार्ग प्रशस्त होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.