Dr. Neelam Gorhe यांनी राज्यातील शैक्षणिक धोरणावर केली गंभीर टीका; म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या परीक्षा…

68

विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात (Ferguson College) होणाऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रकार परिषदेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेबद्दल टीका केली आहे. (Dr. Neelam Gorhe)

पत्रकार परिषदेत (Dr. Neelam Gorhe press conference) डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता थेट आठवीपर्यंत पास करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा होता, तसेच या चुकीच्या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांना आता विशेष प्रशिक्षणाची गरज आहे. त्यासाठी तज्ज्ञ समितीने आढावा घ्यावा असे डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मत आहे. विशेष म्हणजे, मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन (Vishwa Marathi Sahitya Sammelan) पुण्यात होत आहे.

(हेही वाचा – BMC : स्मशानभूमींसह रस्त्यावरील पथदिवे जोडणार जीपीएस यंत्रणेला; बिघाड आणि दुरुस्तीची माहिती अधिकारी घेणार वेबवरून)

महिलांच्या समान हक्कांबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली की, जागतिक सर्वेक्षणानुसार (Global survey) महिलांना समान दर्जा मिळण्यासाठी अजून १५८ वर्षे लागतील. मात्र साक्षरतेमध्ये महिलांची संख्या वाढत असून विविध क्षेत्रांत त्या अग्रेसर होत आहेत. महिलांच्या बाबतीत दुजाभाव न करता समान भूमिका स्वीकारली जावी, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

(हेही वाचा – India-Indonesia Coast Guard मधील सामंजस्य करार तीन वर्षांसाठी वाढवला)

संमेलनात एक लाख विद्यार्थी, एक हजार साहित्यिक आणि ५०० प्राध्यापकांचा सहभाग अपेक्षित आहे. परदेशातूनही मोठ्या संख्येने साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात महिला आणि स्त्रीवादी साहित्यावर (Women and Feminist Literature) विशेष चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांची उपस्थिती अपेक्षित आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.