okra water: रोज सकाळी उठल्यानंतर प्या भेंडीची पाणी, शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

43

भेंडीच नव्हे तर भेंडीचे पाणीही आरोग्यासाठी खूप लाभदायी मानले जाते. चला जाणून घेऊया भेंडीचे पाणी कसे बनते आणि याचे फायदे काय आहेत. ते जाणून घेऊयात. भेंडी ही एक हिरवी भाजी आहे, जी पाहून मुले तोंड वाकडे करतात. तर घरातील मोठे ती चवीने खातात. भेंडी (Okra) ही अनेक पोषणमूल्यांचा खजिना आहे. यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, व्हिटामिन अ, ब, क, थायमेन आणि रिबोफ्लेव्हिनसारखे अनेक पोषक घटक असतात. भेंडी प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करते.

भेंडीचे पाणी पिण्याचे फायदे

कोलेस्ट्रॉल कंट्रोल होते

कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढल्याने ह्रदयविकाराचा धोका वाढतो, त्यासाठी ते नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी भेंडीचे सेवन लाभदायी असते. यात फायबर उच्च प्रमाणात असते. जे कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी मदत करते.

ह्रदयाची काळजी घेते

भेंडीचे पाणी ह्रदयाला (heart) निरोगी ठेवते. यातील पॅक्टिन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. भेंडीत आढळणारे विरघळणारे फायबर, रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते. शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी झाल्याने ह्रदयाशी निगडीत समस्या दूर होतात.

मधुमेहातही फायदेशीर

मधुमेहाच्या रुग्णांसाठी भेंडीचे सेवन लाभदायी आहे. डायबिटीजचे रुग्ण जर भेंडीच्या पाण्याचे सेवन करत असतील, तर यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते.

पचन सुधारते

पचनाशी (Digestion) निगडीत समस्या असेल तररिकाम्या पोटी भेंडीचे पाणी पिणे लाभदायी ठरते. भेंडीच्या पाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनसंस्था मजबूत करते आणि बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा समस्या दूर करण्यास मदत करते.

बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते

भेंडीच्या पाण्यात फायबरचे प्रमाण पुरेसे असते. फायबर पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करते. भेंडीच्या पाण्यात फायबर असल्याने पोट साफ करण्यात ते फायदेशीर ठरते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यात मदत होते.

प्रतिकारशक्ती वाढवते

भेंडीत व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यातही भेंडीची मोठी मदत होते. बदलत्या ऋतूत ज्या लोकांना सर्दी, खोकला, तापाची समस्या असते, त्यांनी आठवड्यात 1-2 वेळा भेंडीचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

डोळ्यांसाठी फायदेशीर

भेंडीत व्हिटामिन ए आणि बीटा कॅरोटिन असते. यामुळे डोळ्यांची क्षमताही वाढते. चांगल्या डोळ्यांसाठी भेंडीच्या पाण्याच्या नियमित सेवनाचा सल्ला दिला जातो.

त्वचेसाठी फायदेशीर

भेंडीच्या पाण्याचे सेवन त्वचेसाठीही फायदेशीर आहे. भेंडीचे पाणी अँटीऑक्सिडंटने भरपूर असते. जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. रिकाम्या पोटी भेंडीच्या पाण्याच्या सेवनाने त्वचा तेजस्वी होते.

अॅनिमियापासून बचाव

भेंडीत मोठ्या प्रमाणात लोह असते. लोहाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हिमोग्लोबिन वाढते. ज्यामुळे अॅनिमियाची समस्या दूर होते. भेंडीतील पोषक तत्व रक्तप्रवाह चांगला ठेवण्यात सहायक ठरतात.

वजन नियंत्रणात मदत

भेंडीच्या पाण्यातील पोषक घटक वजन नियंत्रण ठेवण्यात मदत करतात. वजन घटवणे आणि स्थूलतेवर नियंत्रणात मदत मिळते.

भेंडीचे पाणी केव्हा प्यायला हवे

भेंडीच्या पाण्याचे सेवन नेहमी जेवणाच्या अर्ध्या तासापूर्वी केले पाहिजे. जेवण्यापूर्वी भेंडीच्या पाण्याच्या सेवनाने शरीराला याचे सर्व लाभ मिळतात. गरोदर महिला, स्तनदा मातांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने भेंडीच्या पाण्याचे सेवन केले पाहिजे. ज्या लोकांना भेंडीची अॅलर्जी आहे, त्यांनी याच्या पाण्याचे सेवन करु नये असा सल्ला दिला जातो.

(हेही वाचा – Uddhav Thackeray यांना धक्क्यावर धक्के देण्याची Shiv Sena ची तयारी?)

कसे बनवावे भेंडीचे पाणी

  • भेंडीचे पाणी बनवण्यासाठी 8 ते 10 भेंड्या मधून कापून त्या रात्रभर दोन ग्लास पाण्यात भिजवून ठेवाव्या.
  • भेंडी रात्रभर पाण्यात भिजल्यानंतर त्यातून उरलेला रस पिळून तो पाण्यात मिसळावा.
  • भेंडीचे पाणी तयार झाले आहे. याशिवाय भेंडीचे पाणी उकळूनही तयार केले जाऊ शकते.
  • भेंडीचे पाणी तयार करण्यासाठी 2 ग्लास पाणी गरम करा.
  • या पाण्यात 10 ते 15 भेंड्या मधून कापून टाका.
  • 2 ते 3 मिनिटांसाठी भेंडी पाण्यासोबत उकळू द्याव्या.
  • जेव्हा भेंड्यांतील सर्व रस पाण्यात मिसळेल तेव्हा त्या ग्लासमधून काढून घ्याव्या.
  • भेंडीचे पाणी पिण्यासाठी तयार आहे.

या गोष्टींची काळजी घ्या

रिकाम्या पोटी भेंडीच्या पाण्याचे सेवन करू नये. असे केल्यास नुकसान होऊ शकते. जेवणाच्या अर्धा तास आधी हे पाणी पिऊ शकता. याशिवाय अनेकांना भेंडीची अॅलर्जीही असते. अशा लोकांनी याचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.