MHADA महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल उभारणार; Eknath Shinde यांची माहिती

85
MHADA महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल उभारणार; Eknath Shinde यांची माहिती
MHADA महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल उभारणार; Eknath Shinde यांची माहिती

ठाण्यात पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ संगणकीय सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. या वेळी शिंदेंनी (Eknath Shinde) महत्त्वाची माहिती दिली. म्हाडाच्या (MHADA) घरांवर लोकांचा विश्वास वाढल्यामुळेच म्हाडाचे नवे धोरण आणले जात आहे.

हेही वाचा-राज्यातील सर्व शासकीय इमारतींचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करावे; DCM Ajit Pawar यांचे निर्देश

या धोरणानुसार सर्वसामान्यांना परडवणारी घरे, महिला, ज्येष्ठ नागरिक (senior citizens) आणि विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल (hostels) उभारणी केली जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाण्यात दिली. त्या माध्यमातून लोकांना हक्काचे घर उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा-PMP Bus अचानक बंद पडण्याचे प्रमाण घटले

शिंदे म्हणाले की, “ज्यांना घरे मिळणार आहेत, त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. सरकार म्हणूनही आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. घर घेणे प्रत्येकाचे स्वप्न असते. महागडी घरे घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे म्हाडाच्या (MHADA) माध्यमातून बुधवारी ३६६२ जणांना घरे मिळाली. परंतु ही घरे मिळावी यासाठी ९३ हजार ६६२ अर्ज आले होते. ७१ हजारांहून अधिक जणांनी प्रक्रिया पूर्ण केली होती.” (Eknath Shinde)

हेही वाचा-Govind Pansare Murder Case : पुरोगाम्यांचा दबाव दूर करण्यासाठी पानसरे खटला कोल्हापूर जिल्ह्याबाहेर चालवा; सनातन संस्थेची मागणी

“म्हाडाच्या (MHADA) लॉटरी पद्धतीत अतिशय पारदर्शकता आहे. अर्ज भरण्यापासून घर देईपर्यंत ऑनलाइन काम केले जाते. यात ब्रोकर किंवा इतर कुणी घर मिळवून देण्याचे आमिष दाखवत असेल तर ते खोटे आहे. सर्वसामान्यांच्या गृह स्वप्नपूर्तीसाठी शासन कटिबद्ध आहे. येत्या दोन वर्षांत म्हाडाच्या माध्यमातून राज्यात सुमारे एक लाख घरांच्या उभारणीसाठी प्रयत्न केले जात आहेत. या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल.” अशी माहिती शिंदे यांनी दिली. (Eknath Shinde)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.