प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमध्ये झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारने ५ लाखांची मदत घोषित केली आहे. (Prayagraj Kumbh Mela 2025) मौनी अमावस्येच्या निमित्ताने त्रिवेणी संगमात अमृत स्नान करण्यासाठी कोट्यवधी भाविक महाकुंभक्षेत्री आले होते. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करण्यासाठी शेकडो-हजारो भाविक त्रिवेणी संगमावर आले असता अचानक चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला, तर 90 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
(हेही वाचा – MHADA महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल उभारणार; Eknath Shinde यांची माहिती)
या घटनेतील 30 मृतांपेकी 25 जणांची ओळख पटली असून, त्यापैकी 19 युपीतील, 4 कर्नाटकातील आणि 1 गुजरातचा आहे. उर्वरित 5 जणांची ओळख पटवली जात आहे. (KUMBH MELA stampede)
‘ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले, त्या सर्वांप्रती आम्ही तीव्र शोक व्यक्त करतो. काल रात्रीपासून आम्ही प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत. कुंभमेळा प्राधिकरण, पोलीस, प्रशासन, NDRF, SDRF आणि इतर सर्व यंत्रणांना येथे तैनात करण्यात आले आहे’, असे उत्तरप्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
घटनेच्या 19 तासांनंतर पोलीस आणि न्यायपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत मृतांचा आकडा जाहीर केला. ‘सरकारने या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आम्ही न्यायमूर्ती हर्ष कुमार, माजी डीजी व्हीके गुप्ता आणि निवृत्त आयएएस डीके सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय न्यायालयीन आयोग स्थापन केला आहे. आम्ही दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रण कक्षातून, मुख्य सचिवांच्या नियंत्रण कक्षातून आणि डीजीपींच्या नियंत्रण कक्षातून संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून होतो. दिवसभर अनेक बैठका झाल्या, घटनेबाबत प्रशासनाशी सतत संवाद साधला जात होता. सकाळपासून पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांचे फोन आले आणि त्यांनी योग्य त्या सूचना केल्या, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. (Prayagraj Kumbh Mela 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community