Delhi Assembly Election 2025 : मराठी भाषिक दिल्लीकर सत्ता स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Delhi Assembly Election 2025 : दिल्लीकर मराठी भाषिकांतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागरी सत्कार

61
Delhi Assembly Election 2025 : मराठी भाषिक दिल्लीकर सत्ता स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Delhi Assembly Election 2025 : मराठी भाषिक दिल्लीकर सत्ता स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
दिल्लीचा जागतिक दर्जाचा विकास दारू घोटाळा करणाऱ्या केजरीवाल यांना करणे शक्य नाही. त्यासाठी दिल्लीत भाजपाचेच सरकार हवे, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, २९ जानेवारी या दिवशी दिल्लीतील महाराष्ट्र रंगायन येथे केले. (Delhi Assembly Election 2025)
ऐतिहासिक काळात दिल्ली वाचविण्यासाठी मराठ्यांना बोलावून घेण्यात आले होते. त्या वेळी अब्दालीने तहाची तयारी दाखवली होती. मात्र, मराठ्यांनी अटकपर्यंत हिंदवी साम्राज्य असल्याचे सांगितले होते. आताही दिल्लीत भ्रष्टाचार आणि कुशासन यांचे राज्य आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत परिवर्तनाचा नारा दिला आहे. त्यास पहिला प्रतिसाद दिल्लीतील मराठीजन देतील, असा विश्वास आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Delhi Assembly Election 2025)
अरविंद केजरीवाल आणि आप हे सर्वांत बेईमान असल्याचे अण्णा हजारे यांनीही सांगितल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “कुशासनामुळे दिल्ली संकटात आहे. पंतप्रधान मोदी विकसित भारताचे लक्ष्य साध्य करत आहेत. त्यामध्ये दिल्ली अविकसित राहून चालणार नाही. गेल्या १० वर्षांत आप सरकारने खोटे बोलण्याचे धोरण ठेवले आहे. खोटेपणा आणि भ्रष्टाचार या स्पर्धेतील दोन्ही बक्षिसे आप सरकारलाच जातील. दिल्लीत पायाभूत सुविधा, रस्ते, शुद्ध पाणी, शुद्ध वातावरण हा दिल्लीकरांचा हक्क आहे. त्यासाठी महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतही डबल इंजिन सरकारची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा विकास होत आहे, तसेच दिल्लीतही होणारच”, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला आहे. (Delhi Assembly Election 2025)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरातील (एनसीआर) मराठी तर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. दिल्ली भाजपच्या मराठी प्रकोष्ठतर्फे यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. दिल्लीतील विविध मराठी संस्था आणि संघटनाही यामध्ये सहभागी होत्या. (Delhi Assembly Election 2025)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.