Virat Kohli : विराट कोहलीला छोट्या चाहत्याने जेव्हा प्रश्न विचारला, ‘भारताकडून खेळण्यासाठी काय करावं लागतं?’

Virat Kohli : विराट १२ वर्षांनी दिल्लीकडून रणजी सामना खेळणार आहे

49
Virat Kohli : विराट कोहलीला छोट्या चाहत्याने जेव्हा प्रश्न विचारला, ‘भारताकडून खेळण्यासाठी काय करावं लागतं?’
Virat Kohli : विराट कोहलीला छोट्या चाहत्याने जेव्हा प्रश्न विचारला, ‘भारताकडून खेळण्यासाठी काय करावं लागतं?’
  • ऋजुता लुकतुके

दिल्लीकडून १२ वर्षांनंतर रणजी सामना खेळणार असलेला विराट कोहली संघाच्या सरावादरम्यानही लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. दिल्ली संघाच्या सरावालाही लोकांनी गर्दी केली होती. आणि खासकरून विराट कोहलीच्या प्रत्येक हालचालीवर त्याचं लक्ष होतं. विराटने संघाबरोबर प्रत्येक सराव सत्रात भाग घेतला. आणि तो बॅकफूटवर खेळणं आणि बचावात्मक फलंदाजी यावर लक्ष देताना दिसला.  (Virat Kohli)

(हेही वाचा- मुंबईत लवकरच वॉटर टॅक्सी, वॉटर मेट्रो धावणार ? Transport Minister Pratap Sarnaik काय म्हणाले ?)

३० तारखेला (गुरुवार) दिल्ली संघ रेल्वेबरोबर आपला शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. आणि यात संघातील स्टार खेळाडू असेल तो विराट कोहली. २०१२ नंतर तो आपला पहिला रणजी सामना खेळणार आहे. गंमत म्हणजे दिल्लीच्या रणजी खेळाडूंनीही विराट सरावासाठी असल्यामुळे आपल्या मुलांना सराव पाहण्यासाठी आणलं होतं. (Virat Kohli)

संघात विराटचे जुने मित्र आहेत. आणि त्यातल्याच एका मित्राच्या मुलाने आधी विराटची सही मागितली. आणि नंतर प्रश्न विचारला की, ‘भारतीय संघात यायचं असेल तर काय करावं लागेल?’ विराटने त्याला अगदी प्रामाणिक उत्तर दिलं. ‘खूप सारी मेहनत. आणि सराव कर असं बाबांना सांगायला लागता कामा नये,’ असं विराट या मुलाला हसत हसत म्हणाला. (Virat Kohli)

 विराट या छोट्या दोस्ताला म्हणतो, ‘इतर कुणी पन्नास धावा करत असेल तर तुम्ही १०० करा. त्यांनी १०० केल्या तर तुम्ही २००. समजलं? नेहमी बरोबरच्या मुलांच्या दुप्पट पुढे राहा. तुमचा स्तर कायम वरचा ठेवा. आणि कधीही तुम्हाला सरावासाठी सांगायला लागता कामा नये. तुम्ही स्वत: तयार पाहिजे. कुणी सांगितलं म्हणून तुम्ही नेट्समध्ये जाता हे चुकीचं आहे. उलट तुम्ही कायम म्हणायला हवं की, मी सरावासाठी तयार आहे. आणि आम्ही म्हटलं पाहिजे की, आज विश्रांती घे. अशी वेळ आण.’ (Virat Kohli)

विराटने दिल्ली संघाबरोबर मागचे दोन दिवस एकूण चार सत्रांमध्ये सराव केला आहे. दिल्लीतील थंडीमुळे विराट स्वेटर घालून फलंदाजीला उतरला. पण, त्याने दिल्ली असोसिएशनचा लोगो असलेला टी-शर्ट आणि स्वेटर घातला होता. फलंदाजीबरोबरच त्याने क्षेत्ररक्षण आणि इतर सरावातही भाग घेतला. तसंच दिल्लीकर मित्रांबरोबर तो चांगला वेळ घालवताना दिसला. (Virat Kohli)

(हेही वाचा- Prayagraj Kumbh Mela 2025 : मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत; योगी आदित्यनाथ यांची घोषणा)

रेल्वेविरुद्धच्या सामन्यानंतर विराट ७ तारखेपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सहभागी होईल. आणि त्यानंतर १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स करंडक सुरू होत आहे. (Virat Kohli)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.