GBS : आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसची एन्ट्री; सहा रुग्णांना लागण

59
GBS : आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसची एन्ट्री; सहा रुग्णांना लागण
GBS : आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसची एन्ट्री; सहा रुग्णांना लागण

पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur) पाठोपाठ आता सांगलीमध्येही जीबीएसने (GBS) एन्ट्री केली आहे. सांगली (Sangli) शहरात एक तर ग्रामीण भागात पाच असे सहा गुइलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain-Barré syndrome) रूग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

हेही वाचा-पालिका प्रसूतिगृहांचे सोशल ऑडिट होणार ; High Court कडून समिती स्थापन, अहवाल सादर करण्याचे निर्देश

सांगली शहरात रूग्ण आढळलेल्या चिंतामणीनगरामध्ये बुधवार अखेर 600 घरांचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण करत जलतपासणीही करण्यात आली आहे. सांगली शहरातील चिंतामणीनगरमध्ये एका रूग्णाला जीबीएस आजाराची लक्षणे आढळून आली असून त्याच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. (GBS)

हेही वाचा-मुंबईत लवकरच वॉटर टॅक्सी, वॉटर मेट्रो धावणार ? Transport Minister Pratap Sarnaik काय म्हणाले ?

जिल्ह्यात बुधवार अखेर जीबीएसचे सहा संशयित रूग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली. सांगलीत आढळलेला रूग्ण अजमेर, आग्रा आदी ठिकाणी जाउन आला असल्याने त्या ठिकाणी या आजाराची लागण झाली असल्याची शक्यता आरोग्य विभागाने म्हटलं आहे. (GBS)

हेही वाचा-Prayagraj Kumbh Mela 2025 : मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत; योगी आदित्यनाथ यांची घोषणा

संशयित रूग्णावर योग्य उपचार सुरू असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आलं आहे. नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचे आणि स्वच्छतेबाबत दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. हातापायामध्ये गोळे, मुंग्या येणे, अशक्तपणा, बोलताना, अन्न गिळताना अडचण आली, तर तत्काळ वैद्यकीय उपचार करावेत. आजार संसर्ग जन्य नसल्याने घाबरण्याचे काही कारण नाही, असेही आवाहन करण्यात आलं आहे. (GBS)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.