Ladki Bahin Yojana मध्ये परप्रांतियांचा शिरकाव ; 1171 बोगस अर्ज दाखल

69
Ladki Bahin Yojana मध्ये परप्रांतियांचा शिरकाव ; 1171 बोगस अर्ज दाखल
Ladki Bahin Yojana मध्ये परप्रांतियांचा शिरकाव ; 1171 बोगस अर्ज दाखल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल (Ladki Bahin Yojana) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांनी बोगस लॉगिन आयडी तयार करून तब्बल 1171 अर्ज दाखल केले असल्याचं समोर आलं आहे. हे भामटे उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थान मधील असल्याचे पोलीस, महसूल आणि महिला बाल विकास विभागाच्या तपासात समोर आले आहे. (Ladki Bahin Yojana)

हेही वाचा-अंतराळात अडकलेल्या Sunita Williams यांना मस्क परत आणणार; Donald Trump यांनी दिली जबाबदारी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये परराज्यातील बोगस लाभार्थ्यांनी लातूर (Latur) आणि सांगली (Sangli) जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवत केवळ दोन लॉगिन वरून वेगवेगळ्या जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांच्या नावाखाली 1171 अर्ज दाखल झाले. या योजनेचे अर्ज भरणारे प्रत्यक्षात उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थान मधील असल्याचं पोलीस महसूल व महिला बाल विभागाच्या तपासात पुढे आले आहे. (Ladki Bahin Yojana)

हेही वाचा-Washington DC Plane Crash : अमेरिकेत प्रवासी विमान आणि हेलिकाॅप्टरची भीषण धडक; बचावकार्य सुरु

ज्या दोन लॉगीन वरून 111 अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 22 अर्ज हे एकट्या बार्शी तालुक्यातील असल्याची माहिती आहे. यानंतर अर्जदारांचा लाभ थांबवण्यात आला आहे. एकूण 22 अर्ज हे खोट्या कागदपत्रांच्या आधारे भरल्याचे तपासात समोर आले आहे.याबाबत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ladki Bahin Yojana)

हेही वाचा-पालिका प्रसूतिगृहांचे सोशल ऑडिट होणार ; High Court कडून समिती स्थापन, अहवाल सादर करण्याचे निर्देश

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू झाली होती. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सात हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळाली असून आतापर्यंत एका लाभार्थी महिलेला 10 हजार 500 रुपयांची रक्कम मिळाली आहे. (Ladki Bahin Yojana)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.