India vs USA Trade : भारतातून दर तासाला ८० कोटींचा माल अमेरिकेला होतो निर्यात, जाणून घ्या कशी झाली निर्यातीत वाढ?

भारताची अमेरिकेतून होणारी आयातही वाढली.

73
India vs USA Trade : भारतातून दर तासाला ८० कोटींचा माल अमेरिकेला होतो निर्यात, जाणून घ्या कशी झाली निर्यातीत वाढ?
India vs USA Trade : भारतातून दर तासाला ८० कोटींचा माल अमेरिकेला होतो निर्यात, जाणून घ्या कशी झाली निर्यातीत वाढ?
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि अमेरिका दरम्यानच्या द्विपक्षीय व्यापाराविषयी सध्या नवीन ट्रंप धोरणावरून अनिश्चितता असली तरी सध्या तरी समोर येणारी आकडेवारी आश्वासक आहे. भारतासाठी मालाची सर्वाधिक निर्यात सध्या अमेरिकेला होत असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. आणि हे प्रमाण तासाला ८० कोटी रुपयांपर्यंत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये भारताची अमेरिकेतील निर्यात तब्बल ८.४९ टक्क्यांनी वाढून सात अब्ज डॉलरवर गेली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत अमेरिकेतून भारताची आयात १.९१ टक्क्यांनी वाढून ३३.४ अब्ज डॉलर झाली आहे. (India vs USA Trade)

एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत भारताच्या अमेरिकेत निर्यातीचे आकडे समोर आले आहेत.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत (एप्रिल-डिसेंबर) भारताची अमेरिकेला होणारी निर्यात ५.५७ टक्क्यांनी वाढून ५९.५३ अब्ज डॉलर म्हणजेच ५.२ लाख कोटी रुपये झाली आहे. याचा अर्थ भारताने दर तासाला ८० कोटी रुपयांचा माल अमेरिकेला निर्यात केला आहे. अमेरिकन बाजारपेठेत भारतीय उत्पादनांना मागणी वाढल्याने निर्यातीत वाढ झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये भारताची अमेरिकेतील निर्यात ८.४९ टक्क्यांनी वाढून सात अब्ज डॉलरवर गेली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत अमेरिकेतून भारताची आयात १.९१ टक्क्यांनी वाढून ३३.४ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी झाली आहे. तर डिसेंबरमध्ये तो ९.८८ टक्क्यांनी वाढून ३.७७ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. (India vs USA Trade)

(हेही वाचा – ऑगस्ट 2024 पासून बंद असलेली India-Israel flight सेवा 2 मार्चपासून पूर्ववत होणार)

सध्याचा कल पाहता येत्या काही महिन्यांत दोन्ही देशांमधील व्यापार आणखी वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल-डिसेंबर दरम्यान दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार ९३.४ अब्ज डॉलर होता. त्याच वेळी, याच कालावधीत भारत आणि चीनमध्ये ९४.६ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील संभाव्य व्यापार युद्धामुळे भारतीय निर्यातदारांना मोठ्या संधी निर्माण होतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. (India vs USA Trade)

२०२१-२२ या वर्षात अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारताच्या एकूण वस्तूंच्या निर्यातीत अमेरिकेचा वाटा सुमारे १८ टक्के आहे, तर आयातीत तो सहा टक्क्यांहून अधिक आहे. तर द्विपक्षीय व्यापारात ते अंदाजे ११ टक्के आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इशारा दिल्याप्रमाणे अमेरिकेने काही भारतीय वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लादल्यास त्याचा व्यापारावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता काही जाणकारांनी व्यक्त केली आहे. (India vs USA Trade)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.