युवासेनेतर्फे ९ फेब्रुवारीला Common Man Day साजरा होणार

71
युवासेनेतर्फे ९ फेब्रुवारीला Common Man Day साजरा होणार
युवासेनेतर्फे ९ फेब्रुवारीला Common Man Day साजरा होणार

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त युवासेनेतर्फे ९ फेब्रुवारी २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘कॉमन मॅन दिन’ (Common Man Day) साजरा केला जाणार आहे. युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) यांच्या संकल्पनेतून आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ६१ सर्वसामान्य नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. शेतकरी, कष्टकरी, वारकरी, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, विद्यार्थी आणि असंघटित कामगार अशा विविध घटकांतील व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे.

(हेही वाचा – आधी गोळीबार, नंतर सुटका; भारताने आक्षेप घेताच Sri Lanka ने केली 6 मासेमारांची सुटका)

दरवर्षी उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेतर्फे सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदा त्याला अधिक व्यापक स्वरूप देत ‘कॉमन मॅन दिन’ (Common Man Day) साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “सर्वसामान्यांचे हित सर्वतोपरी” या ब्रीदावर कार्य करणारे शिंदे हे लोकनेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांच्या कार्याची पावती म्हणून हा अनोखा उपक्रम राबवला जात असल्याचे युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी सांगितले.

यापुढे दरवर्षी ९ फेब्रुवारीला ‘कॉमन मॅन दिन’ (Common Man Day) म्हणून साजरा करण्याचे आवाहन युवासेनेने केले आहे. या उपक्रमाची घोषणा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.